शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षांनंतर साधणार स्मार्ट आरसी वाटपाचा मुहूर्त, कंपनीकडून टेस्टिंग पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2018 16:46 IST

प्रादेशिक परिवहन कार्यालयातून तब्बल तीन वर्षांनंतर स्मार्ट आरसीचे वाटप सुरू करण्यात येणार आहे. या आठवड्यात स्मार्ट आरसीचा मुहूर्त साधण्यात येणार असून, त्यासाठी अर्जदाराकडून २०० रुपये शुल्क आकारला जाणार आहे.

प्रदीप भाकरेअमरावती : येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयातून तब्बल तीन वर्षांनंतर स्मार्ट आरसीचे वाटप सुरू करण्यात येणार आहे. या आठवड्यात स्मार्ट आरसीचा मुहूर्त साधण्यात येणार असून, त्यासाठी अर्जदाराकडून २०० रुपये शुल्क आकारला जाणार आहे.आरटीओ अमरावती विभागांतर्गत येणा-या यवतमाळ उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातून स्मार्ट आरसीचे वितरण सुरू झाले असून अमरावतीसह बुलडाणा, वाशिम येथील स्टेटिंग झाल्यावर याच आठवड्यात वितरणाला सुरुवात होईल. खासगी वाहनांचे स्मार्ट आरसी पोस्टद्वारे पाठविण्यात येणार आहेत, तर परिवहन संवर्गातील वाहनांचे स्मार्ट आरसी आरटीओमध्येच वितरित केले जाईल.परिवहन विभागाने रोझ मार्टा कंपनीशी केलेला करार संपुष्टात आल्यानंतर डिसेंबर २०१४ पासून वाहनधारकांना परस्पर आरसी दिली जात होती. मध्यंतरी आरसी छपाईसाठी कागद उपलब्ध होत नसल्यास साध्या कागदावर आरसी देण्यात येत होती. तो कागद अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याने स्मार्टकार्ड देण्याची मागणी होती. त्या पार्श्वभूमीवर एप्रिल २०१७ मध्ये रोझ मार्टा या कंपनीलाच स्मार्ट आरसीचे कंत्राट देण्यात आले.मात्र, तांत्रिक अडचणींमुळे नोव्हेंबर २०१७ मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील आरटीओ कार्यालयात रोझ मार्टाने कामास सुरुवात केली. पश्चिम विदर्भात स्मार्ट आरसीसाठी या कंपनीला जानेवारी उजाडला आहे. वाहनधारकांकडून आकारण्यात येणा-या २०० रुपयांमधून ५४ रुपये रोझ मार्टाला देण्यात येणार आहेत. उर्वरित रक्कम सरकारी महसुलात जमा होईल.यवतमाळ उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत स्मार्ट आरसीचे वितरण सुरू केले आहे. अमरावतीतही टेस्टिंग पूर्ण झाली असून, या आठवड्यात येथूनही स्मार्टकार्ड आरसी देण्यात येईल.- विजय काठोळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, अमरावती

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसAmravatiअमरावती