शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

फास्टॅगचा पहिल्याच दिवशी राज्यात फज्जा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2019 06:43 IST

वाहनांच्या रांगा : नेटवर्कअभावी टोल घेण्यास विलंब; प्रवाशांना मनस्ताप

खेड शिवापूर (जि. पुणे) : नेटवर्क अभावी अनेक वाहनचालकांनी फास्टॅग न लावल्याने आणि टोल नाक्यांवर लेनचे योग्य नियोजन नसल्याने फास्टॅग यंत्रणेचा राज्यात पहिल्याच दिवशी फज्जा उडाला. टोल नाक्यांवर वाहनांच्या रांगा लागल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

टोल नाक्यांवरील वाहनांची गर्दी कमी करण्यासाठी, तसेच वाहनांचा वेग वाढविण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने राज्यातील सर्वच टोल नाक्यांवर रविवारपासून फास्टॅगची सुविधा सुरू केली. पुणे जिल्ह्यात मुंबई-पुणे द्रुतगतीमार्ग, जुना मुंबई पुणे मार्ग, खेडशिवापूर, पाटस टोलनाका, राजगुरूनगर या नाक्यांवर ही यंत्रणा सुरू करण्यात आली.

वेगाने टोलवसुलीसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने राज्यातील सर्वच टोल नाक्यांवर फास्ट गो यंत्रणा राबविण्याची घोषणा केली होती. ही यंत्रणा १ डिसेंबरपासून लागू होणार होती. मात्र, अनेक टोल यासाठी सज्ज नसल्याने मुदतवाढ देऊन रविवारपासून तिची अंमलबजावणी झाली. मात्र, नियोजनाअभावी वाहतूक संथगतीने होत होती. वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. ही यंत्रणा आॅनलाइन आहे. मात्र, अनेक टोल नाक्यांवर नेटवर्कच नव्हते. वाहने पाच ते सात मिनिटे एकाच ठिकाणी थांबून होती.बहुतांश वाहन मालकांनी फास्टॅग न बसविल्याने टोल नाक्यांवर बराचसा विस्कळीतपणा जाणवला. दहापैकी फास्टॅगसाठी पाच व रोखीने टोल भरणा करणाऱ्यांसाठी प्रत्येकी पाच लेन राखीव आहेत, अशी माहिती शनिवारी टोल प्रशासनाने दिली होती.

टॅग्स :tollplazaटोलनाका