शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

राज्यात किंचित गारवा; मुंबईकरांना थंडीची प्रतीक्षा करावी लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2018 02:42 IST

शुक्रवारी नागपूर येथे राज्यात सर्वात कमी किमान तापमान १३ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले असून, उर्वरित शहरांचे किमान तापमानही १५ अंशांच्या आसपास आहे. तर मुंबईचे किमान तापमान मात्र २३ अंशांच्या आसपास नोंदविण्यात येत आहे.

मुंबई : शुक्रवारी नागपूर येथे राज्यात सर्वात कमी किमान तापमान १३ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले असून, उर्वरित शहरांचे किमान तापमानही १५ अंशांच्या आसपास आहे. तर मुंबईचे किमान तापमान मात्र २३ अंशांच्या आसपास नोंदविण्यात येत आहे. परिणामी मुंबई वगळून राज्याला हुडहुडी भरली असून, मुंबईकरांना अजूनही थंडीची प्रतीक्षा करावी लागत आहे.भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. विदर्भाच्या काही भागात किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे. २४ ते २८ नोव्हेंबरदरम्यान राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मुंबईचा विचार करता २४ आणि २५ नोव्हेंबर रोजी मुंबईचे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३६, २३ अंशांच्या आसपास राहील. २४ नोव्हेंबर रोजी आकाश मुख्यत: निरभ्र राहील. २५ नोव्हेंबर रोजी आकाश मुख्यत: अंशत: ढगाळ राहील.मुंबईचे किमान तापमान अगदी सुरुवातीला १८ अंशांच्या आसपास नोंदविण्यात येत होते. मात्र कालांतराने यात वाढ झाली. किमान तापमान २१ अंशांवर दाखल झाले. मात्र दोनएक दिवस पुन्हा ते १८ अंशांवर घसरले. आता पुन्हा किमान तापमान २३ अंशांवर दाखल झाले आहे. किमान तापमान सातत्याने खाली-वर होत असल्याने हवामानातील बदलाचा मुंबईकरांना फटका बसत आहे. परिणामी मुंबईकर त्रस्त असून, उत्तरेकडून जोवर शीत वारे दक्षिणेकडे वाहत नाहीत तोवर मुंबईत पुरेशी थंडी पडणार नसल्याचे चित्र आहे.

टॅग्स :Mumbaiमुंबई