शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

सोळा तास तो झाडाला लटकून बसला

By admin | Updated: July 17, 2017 18:32 IST

अतिदुर्गम कोकणकड्यानजीक असलेल्या मढेघाट धबधब्याच्या कड्यावरुन दाट धुक्यात एक पर्यटक पाय घसरुन दरीत

ऑनलाइन लोकमतवेल्हे, दि. 17 : तालुक्यातील अतिदुर्गम कोकणकड्यानजीक असलेल्या मढेघाट धबधब्याच्या कड्यावरुन दाट धुक्यात एक पर्यटक पाय घसरुन दरीत कोसळल्याची घटना रविवार (दि. १५) रोजी घडली. सुदैव म्हणून दरीत कोसळून तो झाडाच्या फांदीला अडकून बसला आणि यामुळे त्याचे प्राण वाचले. १६ तास तो तेथेच अडकून बसला होता. रमेश सत्यवान माने (रा. चिखली, पुणे, वय-३८) असे आपघातग्रस्त व्यक्तीचे नाव आहे.अधिक माहिती आशी की,  रविवारी पुण्यातील  थरमॅक्स कंपनी मधील १५ जणांचा ग्रुप वेल्ह्यात पावसाळी सहलीसाठी आला होता.  सायंकाळी ५.०० चे सुमारास मढेघाट येथून  सर्वजण परतीला निघत  होते. यावेळी जोरदार पाऊस होता. मात्र दाट धुक्यात अचानक रमेश माने हे गायब झाल्याचे सर्वांना लक्षात आले. सर्व मित्रांनी आरडाओरड करत माने यांचा शोध घ्यायला सुरुवात केली, मात्र घनदाट जंगल,  मुसळधार पाऊस, धोकादायक कडा आणि खोल दर्या यामुळे शोधण्यात अडचणी निर्माण झाल्या. केळदचे ग्रामस्थ व शेतकऱ्यांना घेऊन रात्री १० वाजेपर्यंत शोधाशोध केली पण सदर व्यक्ती कुठेच सापडली नाही. शेवटी मध्यरात्री वेल्हे पोलीस ठाण्यात माने यांचे मित्र प्रविण सदामत यांनी मिसींग तक्रार दाखल केली.दरीमधील १६ तासांचा थरारदाट धुक्यात न दिसल्याने माने उंच कड्यावरुन खाली कोसळून दरीतील झाडाला लटकले. सायंकाळी ५ ते दुसर्या दिवशी स. ९ वाजेपर्यंतचा १६ तासांचा अंधार्या खोल दरीमधे झाडाला लटकण्याचा थरार त्यांनी आनुभवला. हिंस्र श्वापदे, किर्र अंधार, मुसळधार पाऊस यांचा सामना करत त्यांनी रात्र काढली. जबर मार लागल्याने काही तास बेशुद्ध झाल्याने त्यांना आपण कुठे आहोत हे समजात नव्हते. मध्यरात्री पुण्यातील एका ट्रेकर्स ग्रुपला पाचारण करण्यात आले. धाडसी ट्रेकर्सनी रोपच्या मदतीने दरीत उतरुन तब्बल ६ तास शोधमोहीम राबऊन झाडावर लटकलेल्या व्यक्तीला बाहेर काढून त्यांचे प्राण वाचवले. खोल दरीत कोसळूनही दैव बलवत्तर म्हणूनच रमेश माने यांचा जीव वाचला आशी सर्वत्र चर्चा आहे.पहाटेपासून ट्रेकर्सची थरारक शोधमोहीम- मध्यरात्री पुण्यातील दादोजी कोंडदेव ट्रेकर्स व जीमच्या साहसी चार ट्रेकर्सना मढेघाट येथे पाचारण केले. पहाटे ५.०० पासून पडत्या पावसात धोका पत्करुन ट्रेकर्सनी दरीमधे उतरुन शोधमोहीम चालू केली. त्यांना या ग्रुपमधील सदस्यांनीही मदत केली. दाट जंगल आणि घसरडा तीव्र उतार यामधे घुसत माने यांचा शोध चालू झाला. झाडे झुडपे, कपारी, घळी यांमधे शोध घेताना सकाळी ९ च्या दरम्यान खालच्या शेवटच्या बेस पॉईंटवर एका झाडाला लटकलेले अवस्थेतील रमेश माने दिसले आणि सर्वाच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्यांना उचलून कड्यावर आणले व गाडीत घालून वेल्हे ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करुन पुणे येथे उपचारासाठी पाठवण्यात आले.दुर्घटनाग्रस्त माने हे दरीत कोसळून १२ तास होऊन सापडत नसल्याने ते जिवंत असल्याची शक्यता कमीच वाटत होती. मात्र मला सदर व्यक्ती झाडावर दिसला व त्यांनी मला हात केला तेव्हा ते जिवंत आहेत हे कळल्याने मला एकदम स्फूर्ती निर्माण झाली व धोका पत्करुन ग्रुपमधील ट्रेकर्सच्या मदतीने  त्यांना तातडीने बाहेर काढले. कारण त्यांना तात्काळ उपचाराची गरज होती. यासाठी केळद (ता.वेल्हे) ग्रामस्थांनी मोलाची मदत केली.   - सचिन गायकवाड, अध्यक्ष- दादोजी कोंडदेव जीम व ट्रेकर्स,पूणे.पर्यटकांनी वेल्ह्यातील निसर्गाचा आनंद लुटताना स्वत:च्या जिवाचाही विचार करावा. वेल्हे परिसरातील अनेक पर्यटनस्थळे दुर्गम व धोकादायक असल्याने दुर्घटना टाळण्यासाठी प्रत्येकांनी काळजी घ्यावी. अतिउत्साही होऊन धांगडधिंगा करु नये.  मद्यपान करुन गोंधळ घातल्यास व बेशिस्तपणे वागल्यास अशा पर्यटकांवर कठोर कारवाई करण्यात येईल.     - श्री. बडवे, सहा. पोलीस उपनिरिक्षक. वेल्हे.पो.स्टे.