शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

पश्चिम महाराष्ट्रात सहा हजार कोटींचे रस्ते; सार्वजनिक बांधकाम विभागाचे पाच जिल्ह्यांसाठी नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 06:13 IST

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर या पाच जिल्ह्यांमधील ३० रस्त्यांची कामे करण्यात येणार असून ‘हायब्रीड अ‍ॅन्यूईटी’ कार्यक्रमांतर्गत तब्बल पाच हजार ९५२ कोटी रुपये खर्चून हे रस्ते बांधण्यात येणार आहेत.

लक्ष्मण मोरे पुणे : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर या पाच जिल्ह्यांमधील ३० रस्त्यांची कामे करण्यात येणार असून ‘हायब्रीड अ‍ॅन्यूईटी’ कार्यक्रमांतर्गत तब्बल पाच हजार ९५२ कोटी रुपये खर्चून हे रस्ते बांधण्यात येणार आहेत. या रस्त्यांची लांबी जवळपास १ हजार ८२८ किलोमीटरची असणार आहे. त्यासाठीची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आलेली असली, तरी केंद्र शासनाच्या नियमानुसार आर्थिक निकषांमध्ये बसणा-या ठेकेदारांनाच हे काम देण्यात येणार आहे. मात्र, अशा ठेकेदारांची संख्या कमी असल्याने अडचणी उद्भवण्याचीही शक्यता आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पुणे विभागामध्ये ‘हायब्रीड अ‍ॅन्यूईटी’ कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत विभागातील ३० रस्त्यांची निर्मिती केली जाणार आहे. अस्तित्वात असलेल्या रस्त्यांची सुधारणा करणे आणि काही रस्त्यांची नव्याने बांधणी करणे अशा प्रकारची कामे करण्यात येणार आहेत. प्रत्येक रस्त्याचे काम हे अंदाजे सव्वाशे ते दीडशे कोटी रुपयांचे असणार आहे. या कामासाठी केंद्र शासनाच्या आर्थिक निकषांमध्ये बसणारे ठेकेदाराच निवडले जाणार आहेत. मात्र, अशा ठेकेदारांची संख्या कमी असल्याने कदाचित काही ठेकेदार एकत्र येऊन निविदा भरण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Puneपुणे