मुंबई ते करमळीदरम्यान सहा विशेष गाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 06:21 AM2018-05-06T06:21:38+5:302018-05-06T06:21:38+5:30

उन्हाळी सुट्टीत गावी जाणारे प्रवासी तसेच पर्यटकांसाठी मध्य रेल्वे प्रशासनाने मुंबई ते करमळी दरम्यान ६ विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते करमळी स्पेशल आणि पनवेल ते करमळी स्पेशल अशा एकूण सहा विशेष गाड्या आहेत.

 Six special trains between Mumbai and Karamali | मुंबई ते करमळीदरम्यान सहा विशेष गाड्या

मुंबई ते करमळीदरम्यान सहा विशेष गाड्या

googlenewsNext

मुंबई -  उन्हाळी सुट्टीत गावी जाणारे प्रवासी तसेच पर्यटकांसाठी मध्य रेल्वे प्रशासनाने मुंबई ते करमळी दरम्यान ६ विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते करमळी स्पेशल आणि पनवेल ते करमळी स्पेशल अशा एकूण सहा विशेष गाड्या आहेत.
सीएमएमटी ते करमळी दरम्यान दोन विशेष गाड्या सोडण्यात येतील. यात ०११२७ ही गाडी बुधवार ९ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून मध्यरात्री १२.२० वाजता सुटेल. गाडी क्रमांक ०११२८ ही गाडी शुक्रवार ११ मे रोजी करमळीवरून सकाळी १०.२० वाजता सुटेल. दोन्ही गाड्या दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ आणि थिवीम या स्थानकांवर थांबतील. या विशेष ट्रेनमधील १५ डबे स्लीपर व २ डबे सामान्य द्वितीय श्रेणीचे असणार आहेत. पनवेल ते करमळी दरम्यान धावणाऱ्या विशेष दोन गाड्या सोडण्यात येणार आहेत. त्यात गाडी क्रमांक ०११२९ ही बुधवार ९ मे रोजी पनवेल स्थानकावरून रात्री ११.४० वाजता सुटेल आणि दुसºया दिवशी सकाळी ९ वाजता करमळी येथे पोहोचेल. गाडी क्रमांक ०११३० सुपरफास्ट स्पेशल बुधवार ९ मे रोजी करमळी येथून दुपारी २ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री १०.४० वाजता पनवेलला पोहोचेल. या दोन्ही गाड्या रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ आणि थिवीम या स्थानकांवर थांबतील. याही विशेष ट्रेनमधील १५ डबे स्लीपर व २ डबे सामान्य द्वितीय श्रेणीचे असणार आहेत. पनवेल ते करमळी स्पेशलच्या दोन गाड्या धावतील. यात गाडी क्रमांक ०११३१ स्पेशल गुरुवार, १० मे रोजी रात्री ११.४० वाजता पनवेलवरून सुटेल. दुसºया दिवशी सकाळी ९ वाजता करमळी येथे पोहोचेल. गाडी क्रमांक ०११३२ सुपरफास्ट स्पेशल गुरुवार १० मे रोजी दुपारी १.४० वाजता करमळीवरून सुटेल आणि त्याच दिवशी रात्री १०.१५ वाजता पनवेलला पोहोचेल. या दोन्ही गाड्या रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ आणि थिवीम या स्थानकांवर थांबतील. गाडीचे १५ डबे स्लीपर आणि २ सामान्य द्वितीय श्रेणीचे असतील. वरील अतिरिक्त विशेष गाड्यांची बुकिंग पीआरएस केंद्र आणि ६६६.्र१ू३ू.ूङ्म.्रल्ल या संकेतस्थळावर ७ मेपासून उपलब्ध होईल.

Web Title:  Six special trains between Mumbai and Karamali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.