शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

आरे-वारे समुद्रात सहा जण बुडाले, महिला बचावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2018 20:14 IST

रत्नागिरी-गणपतीपुळे मार्गावर असलेल्या आरे वारे येथील समुद्रात पोहण्यासाठी गेलेल्या सहा जणांपैकी एक महिला बचावली असून, पाच जणांचे मृतदेह सायंकाळी उशिरा सापडले तर एक बेपत्ता आहे.

रत्नागिरी : रत्नागिरी-गणपतीपुळे मार्गावर असलेल्या आरे वारे येथील समुद्रात पोहण्यासाठी गेलेल्या सहा जणांपैकी एक महिला बचावली असून, पाच जणांचे मृतदेह सायंकाळी उशिरा सापडले तर एक बेपत्ता आहे. हे सर्वजण बोरिवली (मुंबई) येथील राहणारे आहेत. घटना रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील दोन महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे.

रेंचर डिसुजा (१९), मॅथ्यू डिसुजा (१८), केनेथ डिसुजा (५४), मोनिका डिसुजा (४४), सनोमी डिसुजा (२२, सर्व मेधा कॉलनी, हॉलीक्रॉस रोड, शुभजीवन सर्कल, बोरिवली पश्चिम) अशी मृतांची नावे आहेत. रिटा डिसुजा (७०) यांना वाचवण्यात यश आले आहे. जिल्ह्यातील पर्यटन हंगाम अंतिम टप्प्यात आला असताना घडलेल्या या दुर्घटनेने हंगामाला गालबोट लागले आहे.बोरिवली येथील डिसुजा कुटुंबिय सायंकाळच्या सुमारास आरेवारे येथील समुद्रात स्नानासाठी उतरले होते. मात्र त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने आणि पाण्याचा वेगही जास्त असल्याने लाटांबरोबर ते समुद्रात ओढले जाऊ लागले. त्यापैकी एक महिला लाटांचा तडाखा बसल्याने समुद्रातून बाहेर आली, त्यामुळे बचावली तर अन्य पाचजण समुद्रात गटांगळ्या खावू लागले.

दरम्यान, याबाबतची माहिती नजीकच्या ग्रामस्थांनी पोलिसांना कळवल्यानंतर पोलिसांनी तात्काळ आरे-वारे येथे धाव घेतली. पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने शोध सुरु केला. त्यानंतर नजीकच्या परिसरातच काही मिनिटांच्या अंतराने हे मृतदेह सापडले.

चौकट

फाजील आत्मविश्वास

दोन दिवस बरसलेल्या पावसामुळे समुद्र खवळलेला होता. डिसुजा कुटुंबिय समुद्रात उतरत असल्याचे पाहून स्थानिक ग्रामस्थांनी त्यांना समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला होता. मात्र तरीही हे सारेजण पाण्यात उतरले अन् ही दुर्घटना घडली.