शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

ठेकेदारासह सहा जणांवर गुन्हा दाखल

By admin | Updated: June 28, 2016 05:40 IST

सिंचन घोटाळ्याची चौकशी करत असलेल्या लाचलुचपत प्रतिबंंधक विभागाने मोठी कारवाई करत बडे मासे गळाला लावले.

ठाणे : सिंचन घोटाळ्याची चौकशी करत असलेल्या लाचलुचपत प्रतिबंंधक विभागाने मोठी कारवाई करत बडे मासे गळाला लावले. ठाणे जिल्ह्यातील काळू धरण बांधकामाचा ४५१ कोटी रुपयांच्या कामाचा ठेका मिळवण्यात गैरव्यवहार झाल्याचे उघड झाल्याने एफए एंटरप्रायजेसचे भागीदार निसार खत्री तसेच कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे तत्कालीन कार्यकारी संचालक गिरीश बाबर यांच्यासह सहा जणांविरुद्ध ठाण्याच्या कोपरी पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल झाला आहे. बाबर यांच्याविरुद्धचा हा दुसरा गुन्हा आहे. राज्य सरकारने १२ धरणांच्या चौकशीचे आदेश दोन वर्षांपूर्वी दिले होते. डिसेंबर २०१४पासून एसीबी चौकशी करत आहे. रायगडच्या बाळगंगाप्रकरणी २५ आॅगस्ट २०१५ रोजी गुन्हा दाखल झाला आहे, तर ठाणे जिल्ह्यातील मुरबाडमधील काळू धरणाच्या प्रकल्पाचीही एसीबी चौकशी करत आहे. ठेकेदार खत्री यांना या कामाचा ठेका मिळावा म्हणून कोकण महामंडळाचे तत्कालीन कार्यकारी संचालक बाबर, तत्कालीन मुख्य अभियंता बाबासाहेब पाटील, तत्कालीन अधीक्षक अभियंता सतीश वडगावे, कार्यकारी अभियंता जयवंत कासार व तापी पाटबंधारे विभागाचे तत्कालीन मुख्य अभियंता हरिदास टोणपे यांनी नियम धाब्यावर बसवून मदत केली. मूळ निविदेची किंमत ही ४२१ कोटी रुपयांच्या कामांची होती. ती ४५१ कोटी रुपये करण्यात आली. त्यापैकी १०८ कोटी रुपये ठेकेदाराला मिळाले. धरणाचे काम २५ टक्के झाले असून ते बंद पडले आहे, ही बाब समोर आल्याने या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. काळू नदीवर धरण बांधण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतल्यानंतर कोकण पाटबंधारे विकास महामंडळाने धरणाच्या बांधकामासाठी २००९ मध्ये निविदा मागवल्या होत्या. प्रकल्पाचा ठेका मिळवण्यासाठी महालक्ष्मी, रवासा, एफए एंटरप्रायजेस आणि एफए कन्स्ट्रक्शन या चार कंपन्यांनी निविदा प्रक्रियेत भाग घेतला. त्यातील महालक्ष्मी आणि रवासा या दोन वेगळ्या कंपन्या होत्या, तर एफए एंटरप्रायजेस आणि एफए कन्स्ट्रक्शन या दोन्ही कंपन्या एकाच ठेकेदाराच्या म्हणजे निसार खत्री यांच्याच होत्या. पण, ठेका मिळवण्यात स्पर्धाच असू नये, म्हणून खत्री यांनीच चारही कंपन्यांची प्रत्येकी २५ लाख रुपयांप्रमाणे एक कोटीची बँक गॅरंटी भरली होती. निविदा प्रक्रियेसाठी उर्वरित कंपन्यांच्या नावाने बनावट निविदा भरणे, इसारा रकमेचा डिमांड ड्राफ्ट देणे आदी बेकायदेशीर कृत्ये केल्याचे चौकशीत आढळले. ठेका देताना स्पर्धा न होण्यासाठी बाबर यांच्यासह पाटबंधारे विभागाचे पाच अधिकारी आणि एफए एंटरप्रायजेसच्या उर्वरित भागीदारांनी त्यांना सहकार्य केल्याचाही त्यांच्यावर ठपका ठेवला आहे. (प्रतिनिधी)>शासनाची फसवणूक...एफए एंटरप्रायजेसने बनावट कागदपत्रे तयार करून आणि ती खरी असल्याचे भासवून निविदा आणि बँक गॅरंटी केआयडीसी (कोकण पाटबंधारे विकास महामंडळ)च्या कार्यालयात सादर करून टेंडर प्रक्रियेत भाग घेतला. अशा प्रकारे त्यांनी गुन्हेगारी कृत्य आणि कट करून केआयडीसी आणि पर्यायाने शासनाची फसवणूक केली. यावरून ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक अतुल अहेर यांनी कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.