शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

मध्य रेल्वे : अंबरनाथ-बदलापूरदरम्यान लोकलचा पेंटाग्राफ तुटून सहा प्रवासी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2017 19:21 IST

अंबरनाथ-बदलापूर रेल्वे स्टेशनदरम्यान लोकलचा पेंटाग्राफ तुटून झालेल्या अपघातात सहा प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोन प्रवाशांना कल्याणमधील रेल्वे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कल्याण, दि. 19 - अंबरनाथ-बदलापूर रेल्वे स्टेशनदरम्यान लोकलचा पेंटाग्राफ तुटून झालेल्या अपघातात सहा प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोन प्रवाशांना कल्याणमधील रेल्वे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रेल्वे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या प्रवाशांची नावे सचिन घाग व विनय बडेकर अशी आहे.  विनय हा विद्यार्थी असून सचिन हा डोंबिवलीतील एका खासगी कंपनीतील कर्मचारी आहे. विनयच्या हाताला तर सचिनच्या तोंडाला दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे.  धक्कादायक बाब म्हणजे जखमी प्रवाशांना बदलापूर रेल्वे स्थानकातच रोखून धरण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सचिनचा मित्र देवीदास भगत यांनी सांगितले की, बदलापूर रेल्वे स्थानकात रुग्णवाहिका उभी असतानादेखील सचिन व विनय यांना तातडीने रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल करण्यात आले नाही. घटनास्थळी रुग्णवाहिका 40 मिनिटे थांबवून ठेवण्यात आली होती. दोनच जखमी प्रवासी कसे नेणार अन्य प्रवाशांना जोपर्यंत आणले जात नाही. तोपर्यंत रुग्णवाहिका रुग्णालयात नेली जाणार नाही,  रेल्वे प्रशासनाची अशी चीड आणणरी वृत्ती समोर आल्याने अन्य प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. यामुळेच उपचारांसाठी तब्बल 40 मिनिटे उशीर झाला असल्याचा आरोपही भगत यांनी केला आहे.  

मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर झाला होता  परिणाम

अंबरनाथ स्टेशनवर लोकलचा पेंटाग्राफ तुटल्याने मध्य रेल्वेची कर्जत- कल्याण दरम्यानची रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. लोकल ट्रेन खोळंबल्याने बदलापूर आणि अंबरनाथ स्थानकांवर प्रवाशांची गर्दी वाढली होती. यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. शनिवारी दुपारी 2.45 वाजण्याच्या  सुमारास कर्जतहून मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारी लोकल ट्रेन अंबरनाथ स्टेशनवर येत असताना लोकलचा पेंटाग्राफ तुटला.  पेंटाग्राफ तुटल्याने अंबरनाथ स्टेशनवरुन मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक ठप्प झाली होती.