शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: राज्याच्या चिंतेत आणखी भर; कोरोनाग्रस्तांचा आकडा १०७ वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2020 16:51 IST

दिवसभरात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत १० नं वाढ

मुंबई: राज्यातील कोरोनाग्रस्तांपैकी १२ जणांच्या तपासणीचे अहवाल निगेटिव्ह आल्यानं काहीसा दिलासा मिळाला असताना आणखी ६ जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील ५, तर अहमदनगरमधील एकाला कोरोनाचा संसर्ग झालाय. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा १०७ वर पोहोचलाय. आज राज्यातल्या कोरोनाबाधितांच्या संख्येत १० नं वाढ झालीय. काल रात्रीपर्यंत राज्यातल्या कोरोनाबाधितांची संख्या ९७ होती. मात्र आज सकाळी पुण्यात ३, तर साताऱ्यात एक रुग्ण आढळून आला. यानंतर आता मुंबई आणि नगरमध्येही कोरोनाचे रुग्ण आढळून आल्यानं कोरोनाग्रस्तांची संख्या १०७ वर पोहोचलीय. तत्पूर्वी राज्यातील 8 जणांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती काल समोर आली होती. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 97वर गेली होती. सांगलीतल्या 4, मुंबईतल्या 3 आणि साताऱ्यातल्या एका व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाल्याची नोंद झाली होती. सांगलीत आढळून आलेले चार कोरोनाबाधित सौदी अरेबियावरून आल्याची माहिती मिळाली होती.दरम्यान मुंबई महापालिकेच्या डॉक्टरांनी केलेल्या प्रयत्नांमुळे कस्तुरबा रुग्णालयातील 12 रुग्ण कोरोना विषाणूपासून मुक्त झाले आहेत. या विषाणूची लागण होऊ नये म्हणून मुंबईकरांनी घराबाहेर पडू नये, गर्दीत जाऊ नये तसेच विषाणूची लागण झाल्यास थेट रुग्णालयात भरती व्हावे, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाच्या उप मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह यांनी केले आहे.गेल्या काही दिवसात कोरोना विषाणूची लागण झालेल्या 12 रुग्णांना बरे करण्यात आले आहे. त्यांच्या चाचण्यांमध्ये ते कोरोना निगेटिव्ह आले आहेत. यामुळे, पालिकेच्या आरोग्य विभागाला या रुग्णांना बरे करण्यात मोठे यश आले आहे. केंद्र आणि राज्य सरकाराच्या मार्गदर्शक तत्वांनुसार या 12 रुग्णांना लवकरच डिस्चार्ज दिला जाणार आहे.​​​​​​​कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी राज्य सरकारनं काल काही महत्त्वाचे निर्णय घेतले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी संध्याकाळी जनतेशी संवाद साधत राज्यात संचारबंदी लागू करत असल्याची माहिती दिली. त्याआधी राज्यात जमावबंदी लागू होती. मात्र तरीही अनेक जण रस्त्यानं प्रवास करत असल्यानं, एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जात असल्यानं संचारबंदीचा निर्णय घेण्यात आला. सर्व जिल्ह्यांच्या सीमा बंद करण्यात येत असल्याची माहितीदेखील मुख्यमंत्र्यांनी दिली. परिस्थिती सध्या धोकादायक वळणावर असून सर्वांनी घरीच राहावं असं कळकळीचं आवाहन त्यांनी पुन्हा एकदा राज्यातल्या जनतेला केलं.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस