शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

सीताराम कुंटे आता गृह विभागात; लोकेशचंद्र सिडकोतून जलसंपदामध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2020 02:06 IST

नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी कैलाश जाधव यांची बदली झाली. ते राधाकृष्ण गमे यांची जागा घेतील.

मुंबई : राज्य शासनाने बुधवारी १८ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांची गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून बदली करण्यात आली. कौशल्य विकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची कुंटे यांच्या जागी सामान्य प्रशासन विभागात बदली करण्यात आली आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेशचंद्र यांची बदली जलसंपदा विभागात प्रधान सचिवपदी झाली.

राधाकृष्णन बी. आता नागपूर महापालिकेचे आयुक्त झाले आहेत. कोकण विभागीय आयुक्त म्हणून अण्णासाहेब मिसाळ यांची नियुक्ती केली. आंशु सिन्हा कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या नव्या सचिव असतील. त्यांच्या जागी प्रधान सचिव एस. एम. देशपांडे जात आहेत. दीपा मुधोळ जलस्वराज्य प्रकल्पाच्या प्रकल्प व्यवस्थापक असतील.

नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी कैलाश जाधव यांची बदली झाली. ते राधाकृष्ण गमे यांची जागा घेतील. परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांची बदली राज्य परिवहन महामंडळाच्या उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी करण्यात आली. त्यांच्या जागेवर अविनाश ढाकणे नवे आयुक्त असतील. महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वामी एन. आता राष्ट्रीय आरोग्य मिशनचे नवे राज्य आयुक्त व संचालक असतील. नॅशनल रुरल लाइव्हलीहूड मिशन; नवी मुंबईच्या मुख्य कार्यकारी अधिकारी विमला आर. यांची बदली जलजीवन मिशन; मुंबईच्या संचालकपदी करण्यात आली. डॉ. नरेश गीते यांची बदली महानंदच्या व्यवस्थापकीय संचालकपदावरून महावितरण (औरंगाबाद) येथे सहव्यवस्थापकीय संचालकपदी करण्यात आली.नियुक्तीच्या प्रतीक्षेतील चंद्रकांत डांगे हे भूजल सर्वेक्षण; पुणेचे नवे संचालक असतील. जलस्वराज्य प्रकल्प; नवी मुंबईच्या प्रकल्प संचालकपदी दीपा मुधोळ-मुंडे तर सिडको; नवी मुंबईच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी एस.एस.पाटील यांची बदली झाली. पाटील हे अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. रोहन घुगे यांची बदली आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी आणि सहायक जिल्हाधिकारी; चंद्रपूर म्हणून झाली आहे.

टॅग्स :State Governmentराज्य सरकार