शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळमुक्तीसाठी बहीण-भावाचा लढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 00:55 IST

साताऱ्यातील उपक्रम; ३५ सीसीटी बांध, १ माती बांधाची निर्मिती

सातारा: खुर्द येथील रोहित बनसोडे हा युवक गाव पाणीदार बनवण्यासाठी स्वत: श्रमदान करीत असून, त्याला साथ देत आहे त्याची बहीण रक्षिता! राज्याच्या दुष्काळमुक्तीसाठी या भाऊ-बहिणीचा आदर्श युवा पिढीने घेण्यासारखा आहे.गोंदवले खुर्द गावातील रोहित शंकर बनसोडे हा १६ वर्षीय युवक व्यायामासाठी घरापासून दोन किलोमीटरवरील जानाई तलाव परिसरात जात होता. त्याच माळरानावर दिसणाºया उजाड- बोडक्या टेकड्यांवर पाणी अडवण्याचे काम आपण केले, तर पाणीप्रश्न निकाली निघू शकतो, हे त्याच्या मनात आले. त्यानंतर तो व्यायामाला येताना दररोज खोर-टिकाव, पाटी घेऊन येऊ लागला. पाणी अडविण्यासाठी त्याने खोदकाम सुरू केले. काही दिवसांपासून आपला भाऊ करीत असलेले श्रमदान पाहून, त्याची १३ वर्षीय बहीण रक्षिताही मदतीला पुढे सरसावली.या दोघांनी मिळून ३५ सीसीटी बांध व १ मातीबांध जानाई तलाव परिसरात तयार केला, ही माहिती समजताच माजी आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या पत्नी अनुराधा देशमुख यांनी या ठिकाणी पाहणी केली. त्या हे काम पाहून प्रभावीत झाल्या आणि त्यांनी ड्रीम फाउंडेशनच्या माध्यमातून या बहीण-भावाचा एका वर्षाचा शाळेचा खर्च करण्याचे घोषित केले.गावाला पाणीदार बनविणारमाण तालुक्यातील गोंदवले खुर्द या गावाने पाणी फाउंडेशनच्या वॉटरकप स्पर्धेत भाग घेतलेला नाही. मात्र या गावातील रोहित बनसोडे आपल्या गावाला पाणीदार बनवण्यासाठी एकटाच लढा देत आहे. हे अतिशय स्तुत्य पाऊल असल्याचे माजी आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या पत्नी अनुराधा देशमुख यांनी सांगितले.माझ्या वयाची मुले आज मोबाइल आणि अन्य निरर्थक गोष्टींत गुंतून पडली आहेत. मी इतरांपेक्षा वेगळे काम करीत आहे. हाच आदर्श अन्य मुलांनीही घ्यावा. या श्रमदानातून माझा व्यायाम होत आहे. माझ्या व बहिणीच्या घामाने गावाला पाणीदार बनवणार आहे.- रोहित बनसोडेगोंदवले खुर्द (ता. माण, जि. सातारा) येथे रोहित आणि रक्षिता हे बहीण-भाऊ गावाला पाणीदार बनविण्यासाठी श्रमदान करत आहेत.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई