शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

साहेब, इंग्लिशमध्ये समजले, का मराठीत सांगू? शेतकऱ्याचा नादच खुळा, दिली अतिवृष्टी नुकसानीची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2022 06:21 IST

दिल्लीच्या पथकाला शेतकऱ्याने चक्क इंग्रजी, हिंदी, मराठीत दिली अतिवृष्टी नुकसानीची माहिती

- महेश सायखेडेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या चार सदस्यीय केंद्रीय पथकाला मोडक्यातोडक्या इंग्रजी भाषेत माहिती देणाऱ्या शेतकऱ्याचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. आधी इंग्लिशमधून, नंतर हिंदीतून बोलल्यानंतर त्यांना सरतेशेवटी मायमराठीचा आधार घ्यावा लागल्याचे या व्हिडीओत दिसते. शेतकऱ्याच्या या अनोख्या संवाद शैलीमुळे पथकातील सदस्यही बुचकळ्यात पडले होते.  

नुकसान पाहणीसाठी पथक मंगळवारी सकाळी बोरगाव (ता. देवळी) येथील शेतकऱ्यांच्या बांधावर आले. वर्धेच्या जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यादेखील पथकासोबत होत्या. शेतकरी व्यथा सांगायला पोहोचले. माजी सरपंच प्रशांत निमसडकर यांचेही नुकसान झाले आहे. सध्या त्यांच्या पत्नी बोरगावच्या सरपंच आहेत. अधिकारी दिल्लीचे आहेत म्हटल्यावर त्यांना मराठी कदाचित कळणार नाही, असे वाटल्याने की काय, प्रशांत निमसडकर यांनी थेट इंग्रजीत अधिकाऱ्यांना माहिती देण्यास सुरुवात केली. नदीला पूर कसा आला, पाणी शेतात कसे घुसले याबद्दल ते मोडक्या-तोडक्या इंग्रजीत सांगायला लागले. एक अधिकारी चुळबूळ करायला लागल्यावर मग त्यांनी ‘ट्रॅक’ बदलत हिंदीचा आधार घेतला. दोन-चार वाक्य झाल्यावर मग त्यांना मायमराठीचा आधार घ्यावा लागला.  

‘लॉस ऑफ लाइफ’ टाळण्यात यशसततच्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली. याच पूरस्थितीदरम्यान ॲक्टिव्ह मोडवर आलेल्या तालुका व जिल्हा प्रशासनाला दक्ष नागरिकांच्या सहकार्यामुळेच ‘लॉस ऑफ लाइफ’ टाळण्यात यश असल्याचे यावेळी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी केंद्रीय पथकातील अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.

चक्करच येते हो साहेब...यशोदा नदीचे बॅक वॉटर अनेकांच्या शेतात शिरले. काहींच्या घरात पुराचे पाणी शिरल्याने मोठी नासाडी झाली. अंकुरलेले पिके पाण्याखाली आली, तर काही ठिकाणी पिके वाहून गेली. १९९४ मध्ये पूरस्थितीचे संकट ओढावले होते;  तेव्हाच्या संकटापेक्षा यंदा मोठे नुकसान झाले आहे. शेतातील विदारक परिस्थिती पाहून चक्करच येते हो साहेब. तुम्ही तरी आपल्या अहवालात नुकसानीची वास्तव स्थिती मांडा, असे साकडे निमसडकर यांनी अधिकाऱ्यांना घातले.

टॅग्स :Farmerशेतकरी