शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत ‘अभंगरंग’तून भक्तिरसाची अनुभूती; आषाढीच्या पूर्वसंध्येला महेश काळे लाइव्ह 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2020 14:25 IST

महेश काळे यांच्या भक्तिमय स्वरांची बरसात

ठळक मुद्देउद्या गायक महेश काळे अभंगवाणीतून फुलवणार भक्तीचा मळा घरबसल्या अनुभवता येणार भक्तिमय स्वरांची बरसात

पुणे : 'जाता पंढरीसी सुख वाटे जीवा...' हा आनंद लुटण्यासाठी लाखो वारकरी गेली सातशे वर्षे पंढरीची वारी करतात. यंदा महामारीमुळे महाराष्ट्राच्या या परंपेरवर गंडांतर आले; पण ही उणीव भरून निघणार ‘लोकमत’च्या ‘अभंगरंग’ या लाईव्ह कार्यक्रमातून. आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच मंगळवारी (३० जून) संध्याकाळी साडे पाच वाजता राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक महेश काळे अभंगवाणीतून भक्तीचा मळा फुलवणार आहेत. लोकमत माध्यम समूह आयोजित आणि  संतोष बारणे (सिल्वर ग्रुप) प्रस्तुत हा वेबिनार द आराहना रोझरी फाउंडेशन पुणे यांच्या सहयोगाने होणार आहे.महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरीच्या पांडुरंग-रखमाईला भेटण्यासाठी संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांचे पालखी सोहळे मंगळवारी प्रस्थान ठेवणार आहेत. त्याच वेळी ‘लोकमत’च्या वेबिनारमध्ये टाळ-मृदंगांसह स्वरांचा गजर होणार आहे. एरवी पंढरीचे वाळवंट वारकऱ्यांनी फुलून जाते. विठूरायाच्या गजराने पंढरी दुमदुमते. वैष्णवांचा तोच मेळा लोकमत वेबिनारच्या माध्यमातून जगभर ऑनलाइन रंगणार आहे. जगभराच्या मराठी मनांना या संगीतमय वारीत सहभागी होऊन घरबसल्या पंढरीचे सुख अनुभवता येणार आहे.

अभंगांच्या दिंडीत स्वरांची पालखीबोलावा विठ्ठल, विष्णुमय जग, जाता पंढरीसी, संतभार पंढरीत, अबीर गुलाल यासारखे सुंदर अभंग महेश काळे यांच्या कसलेल्या गायकीतून ऐकता येणार आहेत. तेव्हा विसरू नका येता मंगळवार (३० जून). या दिवशी संध्याकाळी साडेपाच वाजता लोकमत फेसबुक आणि लोकमत यू-ट्यूब चॅनलवरून लाईव्ह प्रसारणाचा आनंद घ्या.इथे पाहता येईल लाईव्ह प्रसारणयूट्यूबवरून पाहण्यासाठी क्लिक करा http://www.youtube.com/LokmatBhaktiफेसबुकवरून पाहण्यासाठी क्लिक करा https://bit.ly/Lokmat_AbhangRang

टॅग्स :Mahesh Kaleमहेश काळेAshadhi Ekadashiआषाढी एकादशी