शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

दोन्ही सरकारच्या काळात महिला अत्याचार सारखेच, नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीतून उघड झाले विदारक चित्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2024 09:56 IST

राज्यात २०१९ पासून सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी व महायुतीच्या सरकारमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या दैनंदिन घटनांची संख्या जवळपास सारखीच होती. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीत ही बाब समोर आली.

 मुंबई - राज्यात २०१९ पासून सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी व महायुतीच्या सरकारमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या दैनंदिन घटनांची संख्या जवळपास सारखीच होती. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीत ही बाब समोर आली.

दोन्ही सरकारमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या घटना दररोज सरासरी १२६  घडल्या. २०२१ या कोरोनाच्या लॉकडाऊन काळात महाराष्ट्रात प्रतिदिवशी १०९ महिला अत्याचाराच्या घटना घडल्या. जानेवारी ते जून २०२२ या काळात १२६ घटना घडल्या होत्या, तितकीच संख्या आजही आहे. 

२०२० या लॉकडाऊनच्या वर्षांत महाराष्ट्रात ३१,७०१ महिलांवर अत्याचार झाले, त्याची सरासरी दररोज ८८ होती. २०२१  वर्षात  अत्याचाराच्या घटनांची संख्या ३९,२६६ वर पोहोचली. याची सरासरी दररोज १०९ होती. जानेवारी ते जून २०२२ याकाळात महाविकास आघाडीच्या काळात एकूण  २२,८४३ घटना घडल्या. सरासरी १२६ होती. 

प्रतिदिन ११६ अत्याचार- ३० जून २०२२ रोजी महायुतीचे सरकार आले. जुलै ते डिसेंबर २०२२ या ६ महिन्यात २०,८३० घटना घडल्या. त्याची सरासरी ११६ प्रतिदिन इतकी होती.- २०२३ मध्ये २०२२ इतक्याच घटना असून, त्याची सरासरी १२६ इतकीच येते. अल्पवयीन मुलींवरचे अत्याचारामध्ये २०२१ पासून मोठी वाढ झाली.- हे गुन्हे २०१७ मध्ये ९४, २०१८ मध्ये ४८, २०१९ मध्ये ९४, २०२० मध्ये ४८ इतके होते. हा आकडा २०२१ मध्ये २४९ वर गेला. २०२२ मध्ये ही  संख्या ३३२ इतकी होती. 

बालिकाच लक्ष्य१८ वर्षांवरील मुलींच्या विनयभंगाच्या गुन्ह्यांची संख्या कमी झालेली दिसून येते.२०२२ मध्ये आघाडी सरकारच्या काळात १,३१७ गुन्हे नोंदले होते, ते २०२३ मध्ये १,२०८ इतके नोंदले   महिलांशी संबंधित सायबर गुन्ह्यांची संख्या २०२२ मध्ये ११६  होती, ती २०२३ मध्ये ७९ इतकी खाली आली. 

मुंबईत बाललैंगिक अत्याचार तुलनेने कमी- मुंबईबाबत विचार केला तर पॉक्सोच्या अंतर्गत कलम ४ आणि ६ अंतर्गत बलात्काराचे नोंदले गेलेले गुन्हे कमी झालेले आहेत.- लॉकडाऊनच्या काळात सुद्धा मुंबईत २०२० मध्ये ४४५ बलात्काराच्या गुन्ह्यांची नोंद झाली. २०२१ मध्ये हा आकडा ५२४ होता.- २०२२ मध्ये ही संख्या ६१५ वर गेली, तर २०२३ मध्ये ती कमी होऊन ५९० वर आली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीWomenमहिला