शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : “तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही”, भाजपाच्या लोणीकरांचं वादग्रस्त विधान
2
इराणने युद्धात शौर्य दाखवले, मी आता त्यांना रोखणार नाही; नाटोच्या परिषदेत ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
3
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
4
लढाई संपली, आता कमाईची संधी! सेन्सेक्स ४०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
5
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा
6
"इतक्या लहान वयात काय गरज आहे?", हिंदी भाषा सक्तीवरुन मकरंद अनासपुरे थेटच बोलले
7
जगातील सर्वांत महागडे लग्न, खर्च तब्बल ७,१३९ कोटी रुपये
8
क्रिप्टोची लालसा, पैशाची हाव अन् प्रियाच्या सौंदर्याची भुरळ; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये केली देशाशी गद्दारी
9
Viral Video: विमानात प्रवाशाचं लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यांनी रंगेहाथ पकडलं, लोकांनी काढला व्हिडीओ!
10
मुंबईच्या सर्वात महागड्या एरियात 'पैशांचा पाऊस'! एका ऑफिससाठी १००० कोटींचं भाडं, कोण आहे मालक?
11
रस्त्यावर उत्सव साजरा करणाऱ्यांवर मेक्सिकोत गोळीबार; १२ जणांचा मृत्यू, २० जण जखमी
12
धक्कादायक! डीजे ऑपरेटरच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
13
खात्यामध्ये किमान १० हजार शिल्लक नसेल तर होणार दंड, कापणार एवढी रक्कम, या बँकेचे आदेश
14
प्रवाशांनी भरलेली बस पूर आलेल्या नदीत कोसळली, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात
15
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
16
सरकारची ‘कर’ कमाई घसरली; उद्दिष्ट गाठण्यात आले अपयश
17
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
18
सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळेल वाढीव आरक्षण; आठ जिल्ह्यांमधील आदिवासींना मोठा दिलासा
19
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
20
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा

रेशीमचा ‘नर्सरी प्रकल्प’ कोमेजला

By admin | Updated: June 17, 2014 00:45 IST

रेशीम शेतीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळण्याच्या दृष्टीने शासनस्तरावर विविध योजना राबविल्या जातात. याच अनुषंगाने यावर्षी महत्त्वाकांक्षी असा नर्सरी प्रकल्प हाती घेण्यात आला. मात्र हा प्रकल्प

चुकांमुळे फसली योजना : नवीन लागवड करणाऱ्यामंध्ये संभ्रम, तुती रोपांची टंचाईसुहास सुपासे - यवतमाळरेशीम शेतीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळण्याच्या दृष्टीने शासनस्तरावर विविध योजना राबविल्या जातात. याच अनुषंगाने यावर्षी महत्त्वाकांक्षी असा नर्सरी प्रकल्प हाती घेण्यात आला. मात्र हा प्रकल्प राबविताना झालेल्या काही चुकांमुळे अपेक्षित लाभ शेतकऱ्यांना मिळालाच नसल्याचे दिसून येते. दरवर्षी अधिकाधिक शेतकऱ्यांनी कमी खर्चातील तुतीची लागवड करून नियमित उत्पन्न देणाऱ्या रेशीम शेतीकडे वळावे आणि शेतीला एक पूरक सक्षम असा पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी शासनाकडून रेशीम शेतीसाठी विविध योजना अनुदानावर राबविल्या जातात. यावर्षी ‘नर्सरी प्रकल्प’ ही योजना राबविण्यात आली. शेतकऱ्यांच्याच शेतात नर्सरी तयार करायची आणि तुतीची नवीन लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना रोपे द्यायची, असे या योजनेचे स्वरुप होते. परंतु या योजनेला पाहिजे तसा प्रतिसाद संपूर्ण विदर्भातच मिळाला नसल्याचे दिसून येते. योजनाच अशावेळी आणल्या गेली, ज्यावेळी शेतकऱ्यांजवळ कलमाच नव्हत्या. त्यामुळे इच्छा असूनही शेतकरी या योजनेत पाहिजे त्या संख्येने सहभागी होऊ शकले नाही. त्यानंतर यावर्षी वाढत्या तापमानामुळे रोपे जगू शकली नाही. आता नवीन लागवडीसाठी ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे, त्यांना रोपे उपलब्ध करून देण्याचे आव्हान रेशीम विभागासमोर आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यात मागणीच्या तुलनेत रोपे कमी असल्याची माहिती आहे. त्यामुळे इतर ठिकाणाहून रोपे मागविणे गरजेचे आहे. तसे झाल्यास वाहतुकीचा खर्च वाढेल, अतिशय काळजीपूर्वक ही रोपे आणावी लागणार आहे. त्यानंतर ती शेतकऱ्यांना वितरित करून जगवावी लागेल, ही अतिशय किचकट प्रक्रिया आहे.