शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

ताडोबा व्याघ्र प्रकल्पात सुरू होणार रेशीम पर्यटन, रेशीम संचालनालयाचा उपक्रम; वनविभागाकडून एक एकर जागा उपलब्ध 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2021 02:06 IST

The Tadoba Andhari Tiger Reserve : चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यात सुमारे २०० ते २५० वर्षांपासून पारंपरिक पद्धतीने टसर रेशीम शेती करून रेशीम कोषाचे उत्पादन घेतले जाते.

- राजेश मडावी

चंद्रपूर : देश-विदेशातील पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या ताडोबा राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्प परिसरात आता ‘टसर टुरिझम’ प्रकल्प सुरू होणार आहे. यासाठी वनविभागाने रेशीम संचालनालयाला एक एकर जागा उपलब्ध  करून दिली आहे. चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यात सुमारे २०० ते २५० वर्षांपासून पारंपरिक पद्धतीने टसर रेशीम शेती करून रेशीम कोषाचे उत्पादन घेतले जाते. या व्यवसायावर शेकडो कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालतो. महाराष्ट्रात धुळे, नाशिक, नंदुरबार, अमरावती, यवतमाळ, नांदेड व ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातही ऐन, अर्जुन, जांभूळ, किंजळ, बोर आदी वृक्ष आढळतात. ताडोबा वन परिसरात तर या वृक्षांची मोठी विपुलता आहे. पूर्णत: नैसर्गिकरीत्या उपलब्ध असलेल्या ऐन व अर्जुन वृक्षांवरच रेशीम व्यवसाय करता येते. ऐन व अर्जुन झाडावर टसर अळ्यांंचे संगोपन करून टसर कोष उत्पादन घेतले जाते. जून-मार्च या कालावधीत वर्षभरातून साधारणत: तीन पिके घेतली जातात. शासनाकडून आता सवलतीच्या दरात अंडीपुंज पुरवठा केला जात आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील बरीच कुटुंबे रेशीम शेतीकडे वळत असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.

याचा हेतू काय?ताडोबा व्याघ्र प्रकल्पात सफारीसाठी येणाऱ्या पर्यटकांना रेशीम कीटक संगोपन, टसर रेशीम कोष उत्पादन ते कोष कताई व रेशीम कापड निर्मितीची प्रक्रिया प्रत्यक्ष अनुभवता यावी आणि दर्जेदार कापड खरेदीला चालना मिळावी, हा प्रकल्पाचा हेतू आहे. त्यामुळे ताडोबा प्रकल्पात येणाऱ्या पर्यटकांना रेशमी कापडही खरेदी करता येऊ शकणार आहे.  

टसर टुरिझम प्रकल्पासाठी ५० लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे. तो सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सुपूर्द करण्यात आला. स्वाईल ते  फेब्रिक असे या प्रकल्पाचे स्वरूप आहे. पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्यास पुन्हा ४३ लाखांचा प्रस्ताव पाठवू. - एम. बी. ढवळे, सहायक संचालक रेशीम संचालनालय, नागपूर 

रेशीम संचालनालयाकडून ‘टसर टुरिझम’चा प्रस्ताव मिळाला आहे. प्रकल्पाचे महत्त्व लक्षात घेऊन आगरझरी प्रवेशद्वाराजवळ रेशीम कापड विक्री केंद्रासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.- डॉ. जितेंद्र रामगावकर, प्रकल्प संचालक ताडोबा, चंद्रपूर

टॅग्स :Tadoba Andhari Tiger Projectताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प