शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

नाशिकमध्ये इन्कम टॅक्सच्या छापेमारीनंतर रखडलेले कांद्याचे लिलाव सुरू; लासलगावमध्ये अजूनही लिलाव बंदच

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2017 15:07 IST

नाशिकमध्ये गेल्या 4 दिवसांपासून रखडलेले कांद्याचे लिलाव आज पुन्हा सुरू झाले आहेत. 

ठळक मुद्दे नाशिकमध्ये गेल्या 4 दिवसांपासून रखडलेले कांद्याचे लिलाव आज पुन्हा सुरू झाले आहेत. लासलगाव वगळता इतर सर्व बाजार समित्यांमध्ये कांद्याचा लिलाव सुरू झाल्याचं समजतं आहे. जिल्हाधिकारी आणि व्यापाऱ्यांची एक बैठकही घेण्यात आली. यानंतर छाप्यानंतरचा वाद थोडा निवळलेला दिसतो आहे, असं बोललं जात आहे.

नाशिक, दि. 18- तीन दिवसांच्या बंदनंतर लासलगाव वगळता जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सोमवारी लिलाव सुरू झाला. उमराणे बाजार समितीत कांद्याला प्रति क्विंटल सर्वोच्च बाजारभाव १४०१ मिळाला. लिलाव सुरु होण्याआधी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मागील आठवड्यात गुरु वारी साठेबाजीच्या नावाखाली आयकर विभागाने जिल्ह्यातील प्रमुख बाजारसमितीतील कांदा व्यापाºयांकडे धाडी टाकल्याने कांदा व्यापाºयांकडून बंद पुकारला होता.त्यात उमराणे येथील व्यापारी खंडु देवरे यांचेकडेही आयकर विभागाने धाड टाकल्याने येथील व्यापारी असोसिएशनतर्फे माल निकाशी होत नसल्याचे कारण देत २५ सप्टेंबर पर्यंत लिलाव बंदचे निवेदन बाजार समितीला देण्यात आले होते. मात्र काल जिल्हाधिकारी व व्यापारी यांची बैठक होऊन बाजार समितीचे लिलाव पुर्ववत सुरु करण्याचे आदेश दिल्याने उमराणे बाजार समतिीचे लिलाव पुर्ववत सुरु झाले आहेत.लिलाव सुरु होतात की नाही याबद्दल शेतकरी वर्गात संभ्रम असल्याने सकाळच्या सत्रात कांदा आवक कमी होती.शिवाय भाव काय निघतात याबाबतही शंका होती. परंतु भाव समाधानकारक निघाल्याने लिलाव सुरळीत सुरु झाला आहे. बाजारभाव कमीतकमी ५०० रु पये,जास्तीत जास्त १४०१ रु पये तर सरासरी भाव १२०० रु पयांपर्यंत होते. दरम्यान, सकाळपासूनच देवळा तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

काय आहे नेमके प्रकरण?जिल्ह्यात कांदा व्यापा-यांवर प्राप्तिकर विभागाने घातलेल्या धाडींचा शेतक-यांना फटका बसला आहे. या धाडसत्राच्या निषेधार्थ व्यापा-यांनी कांदा लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतल्यामुळे शुक्रवारी जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये व्यवहार बंद राहिले. मागील चार ते पाच दिवसांपासून कांद्याचे भाव कमी होत असतानाच गुरुवारच्या धाडसत्रामुळे भावातील घसरण अधिक वेगाने झाली.यामुळे कांदा उत्पादकांची चिंता वाढली आहे.  गुरुवारी लिलाव झाले असले तरी येवला येथील व्यापा-यांनी शुक्रवार ( 15 सप्टेंबर ) व शनिवार (16 सप्टेंबर ) लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला लासलगाव येथे तर व्यापा-यांनी बेमुदत बंद पुकारल्याने शेतक-यांना त्याचा मोठा फटका बसला आहे. वर्षभरापासून गडगडणा-या कांदा दराने अलिकडेच उसळी घेत अल्पावधीत प्रतिक्विंटल अडीच हजारांचा टप्पा गाठला होता. भाव वाढल्याने शेतक-यांनी चाळीत साठविलेला कांदा बाजारात नेण्यास प्राधान्य दिले. शहरी भागात कांदा भावाची ओरड होऊ लागल्याने केंद्र शासनाने भाव नियंत्रित ठेवण्यासाठी उपाययोजना करण्यास सुरुवात केली. 

सटाण्यात एकाच वेळी तीन छापेसटाण्यात आयकर विभागातील अधिका-यांच्या वेगवेगळ्या पथकाने एकाच वेळी तीन ठिकाणी छापे टाकल्याने व्यापा-यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. गुरुवारी (14 सप्टेंबर )सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास येथील कांदा व्यापारी वर्धमान लुंकड यांच्या नाशिक रोडवरील कांदा गुदाम, बाजार समिती आवारातील कार्यालय व निवासस्थानी छापे टाकले. छापेमारीनंतर दिवसभर तपासणी चालूच होती. या कारवाईमुळे खळबळ उडाली असून, काही कांदा व्यापा-यांनी खरेदी बंद ठेवली होती.