मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली: मध्य रेल्वेच्या डोंबिवली रेल्वे स्थानकात सिग्नल फेल झाल्याची घटना शुक्रवारी रात्री ८ वाजता घडल्याने डाऊन धीम्या मार्गवावरील लोकल वाहतूक दिवा ते कल्याण मार्गावर खोळंबली होती. याच खोळंबा झालेल्या लोकलमधील एका लोकलधून एक प्रवासी कोपर स्थानकात उतरल्यानंतर तो रूळ ओलांडत असतांना त्याचा अपघात झाल्याची माहिती मिळाली असून त्यास शास्त्रीनगर रुग्णालयात नेले असून पुढील माहिती वैद्यकीय अहवालानंतर पोलीस यंत्रणा देण्याची शक्यता आहे.
या घटनेमुळे घरी परतणाऱ्या चाकरमान्यांना त्याचा त्रास झाला. दिवा स्थानकातून संध्याकाळी पावणे आठ वाजता सुटणार्या कल्याण लोकलला त्याचा सर्वाधिक फटका बसला. डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डोंबिवलीत सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने ही समस्या निर्माण झाली होती. एकापाठोपाठ एक लोकल उभ्या राहिल्याने प्रवासी ठिकठिकाणी लोकलमध्ये ताटकळले होते. पंधरा मिनिटांनी लोकल वाहतूक कासव गतीने सुरू झाली असली तरी दिवा ते कल्याण अवघ्या १५ मिनिटांच्या अंतराला प्रवाशांना अर्धा ते पाऊण तास लागल्याने ब्रिटिशांची रेल्वे सेवा बरी होती अशी टीका व्यक्त झाली, आणि रेल्वे प्रशासनाच्या कारभारावर नाराजीचा सूर उमटला.
Web Summary : Dombivli's signal failure halted local train traffic. A passenger fell while crossing tracks near Kopar after disembarking. Train delays inconvenienced commuters, sparking criticism of railway management. Services resumed slowly after 15 minutes.
Web Summary : डोंबिवली में सिग्नल विफलता से लोकल ट्रेन यातायात बाधित हुआ। कोपर के पास उतरने के बाद एक यात्री ट्रैक पार करते समय गिर गया। ट्रेन में देरी से यात्रियों को परेशानी हुई, जिससे रेलवे प्रबंधन की आलोचना हुई। 15 मिनट बाद सेवाएं धीरे-धीरे फिर से शुरू हुईं।