शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

Shyam Manav Threat: “तुमचा नरेंद्र दाभोळकर करू”; बागेश्वर बाबांना आव्हान देणाऱ्या श्याम मानव यांना धमकी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2023 16:22 IST

Shyam Manav Threat: बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांना दिलेल्या आव्हानानंतर अंनिसचे श्याम मानव यांना धमक्या येत असल्याचे सांगितले जात आहे.

Shyam Manav Threat: गेल्या काही दिवसांपासून बागेश्वर धाम पीठाचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणजेच बागेश्वर बाबा (Bageshwar Baba) अचानक चर्चेत आले आहेत. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष श्याम मानव यांनी अलीकडेच बागेश्वर बाबांना आव्हान दिले होते. ते आव्हान बागेश्वर बाबांनी स्वीकारलेही होते. यानंतर आरोप-प्रत्यारोप होत आहेत. यातच आता अंनिसचे श्याम माधव यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचे सांगितले जात आहे. 

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सदस्य आणि श्याम मानव यांच्या मुलाच्या मोबाइलवर धमकीचे संदेश आल्याची माहिती देण्यात आली आहे. तुमचा नरेंद्र दाभोळकर करून टाकू, रात्री ११ वाजेनंतर तुम्ही जिवंत राहणार नाही असे म्हणत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मानव यांच्या समर्थकांनी पोलिसांत तक्रार दिली. ही बाब गंभीरतेने घेतली व त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. श्याम मानव यांच्यासोबत आधी दोन सुरक्षारक्षक असायचे. आता त्यात आणखी दोन बंदूकधारी तसेच ३ पोलीस कर्मचारी व अधिकारी तैनात करण्यात आले आहे. बागेश्वर बाबा यांना श्याम मानव यांनी दिले होते आव्हान

लोकांच्या मनातले ओळखण्याची तसेच अनोळखी व्यक्तीविषयी माहिती सांगण्याची दिव्यदृष्टी आपल्याकडे असल्याचा दावा बागेश्वर बाबा यांनी केला होता. याला श्याम मानव यांनी आव्हान दिले. बागेश्वर बाबा उर्फी धीरेंद्र महाराज नागपुरात आले असताना श्याम मानव यांनी त्यांना आव्हान दिले होते. दिव्य शक्ती सिद्ध करून दाखवल्यास त्यांना ३० लाखांचे बक्षीस देऊ, असे ते म्हणाले होते. तसेच महाराष्ट्रातील जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार, बागेश्वर बाबांविरोधात गुन्हा दाखल होऊ शकतो, असा इशाराही श्याम मानव यांनी दिला होता. यानंतर मानव यांना सातत्याने धमक्या येऊ लागल्याचे सांगितले जात आहे. 

दरम्यान, मी कधीही धर्म किंवा देवाविरुद्ध काहीही बोललो नाही. तसेच धीरेंद्र शास्त्री महाराजांबद्दल कधीही वाईट शब्द बोललो नाही. मी फक्त त्या लोकांच्या विरोधात आहे, जे धर्माच्या नावावर लोकांची फसवणूक करतात. तसेच धर्माच्या नावाखाली पसरवल्या जाणार्‍या अंधश्रद्धांबद्दल बोलतो, असे श्याम मानव यांनी म्हटले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :shyam manavश्याम मानवnagpurनागपूर