शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

स्वत:ला स्वामी समर्थांचा अवतार समजणा-या रत्नागिरीतील श्रीकृष्ण पाटील बुवाला पुन्हा अटक, जादुटोणा कायद्यानुसार गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2017 23:06 IST

तालुक्यातील झरेवाडीतील श्रीकृष्ण अनंत पाटील उर्फ पाटील बुवाच्या विरोधात गुरुवारी रात्री जादूटोणाप्रतिबंधक कायद्याअंतर्गत दुसरा गुन्हा दाखल झाला. पहिल्या गुन्ह्यासाठी सकाळी अटक झाल्यानंतर दुपारी त्याला जामीन मंजूर झाला.

रत्नागिरी, दि. 21 - तालुक्यातील झरेवाडीतील श्रीकृष्ण अनंत पाटील उर्फ पाटील बुवाच्या विरोधात गुरुवारी रात्री जादूटोणाप्रतिबंधक कायद्याअंतर्गत दुसरा गुन्हा दाखल झाला. पहिल्या गुन्ह्यासाठी सकाळी अटक झाल्यानंतर दुपारी त्याला जामीन मंजूर झाला. त्यानंतर जादुटोणाविरोधी कायद्यान्वये पाटीलबुवाला पुन्हा अटक करण्यात आली. दरम्यान, झरेवाडीचा बुवाचा मठ बंद करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी गुरूवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

रत्नागिरी शहरातील के. सी. जैननगर या गजबजलेल्या भागात बुधवारी मध्यरात्री त्याला ताब्यात घेतले. महिलेच्या फिर्यादीवरून त्याला अटक करण्यात आली. गुरुवारी त्याला न्यायालयात हजर केले असता १५ हजार रुपयांच्या जामिनावर सोडण्यात आले. मात्र त्यानंतर पोलिसांनी या बुवाला पुन्हा ताब्यात घेतले. अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या निवेदनावरून ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांनी त्याच्याविरोधात जादूटोणा प्रतिबंधक कायदा कलम २ (१)ख, अनुसूची नं.२, ५, ८, कलम ३(२) नुसार गुन्हा दाखल केला आहे. 

‘मी कलियुगातील स्वामींचा अवतार आहे. विष्णूचा अवतार आहे. स्वत:मध्ये दैवी शक्ती आहे. मी चमत्कार करू शकतो, असे भासवून मेलेले मूल ३ सेकंदात जिवंत केले, आंधळ्याच्या डोळ्यावरून हात फिरविल्यानंतर त्याला दृष्टी आली. मी माणूस नाही देव आहे, असे सांगून लोकांना भीती दाखवली व त्यांच्याकडून आर्थिक प्राप्ती करून झरेवाडी येथे मठाचे बांधकाम केले.तसेच लोकांना डॉक्टरकडे जाऊ नका,  असा सल्ला देऊन अनिष्ट व अघोरी प्रथांना खतपाणी घातले, असे आरोप श्रीकृष्ण अनंत पाटील (पाटील बुवा) याच्यावर ठेवण्यात आले आहेत. 

गेल्या काही वर्षांपासून या बाबाच्या कथित चमत्काराबाबत सुरस कथा चर्चेत होत्या. त्याविरोधात आवाज उठविण्याचा प्रयत्नही झरेवाडीतील स्थानिकांनी केला होता. मात्र या बाबाला राजकीय अभय असल्यानेच कारवाई होत नाही, अशी चर्चा स्थानिकांमध्ये होती. अंधश्रध्देला खतपाणी घालणारा हा झरेवाडीतील बाबांचा मठ बंद करावा, अशी मागणीही केली जात होती. मात्र त्याची दखल त्यावेळी घेतली गेली नाही.

गेल्या काही दिवसांपासून पाटीलबुवाच्या विविध लीलांच्या व्हिडिओ क्लीप्स सोशल मिडियावरून व्हायरल झाल्या. त्यानंतरही पोलीस काहीच कारवाई करीत नाहीत, असा आरोप केला जात होता. मात्र या बुवाविरोधात कोणीही तक्रार करण्यासाठी पुढे येत नव्हते ही पोलिसांची अडचण होती. तक्रारी दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या बुवाच्या विरोधात कारवाई केली आहे. 

महिला पोलीस अधिका-याचा पाठिंबाया बुवाला एका महिला पोलीस अधिकाऱ्याचा पाठिंबा असल्याने ग्रामसभेत चर्चा होऊनही पुढे कोणतीही कारवाई झाली नसल्याचा मुद्दा ग्रामस्थांनी आपल्या निवेदनातून जिल्हा प्रशासनासमोर मांडला आहे.