शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
2
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
3
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
4
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले
5
आयुष्य कसं वळणं घेईल? काहीच सांगता येत नाही; एक स्वप्न तुटलं, सोनम राजला भेटली अन्...! मग त्याच्यासाठी केलं एवढं मोठं कांड!
6
'...तर पाकिस्तानात घुसून हल्ला करू', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा पाकिस्तानला थेट इशारा
7
Video - "हनिमूनवरुन जिवंत परतणं ही मोठी कामगिरी..."; सोनम-राजा प्रकरणावर मीम्स व्हायरल
8
राजा रघुवंशीची हत्या, सोनम झालेली बेपत्ता; एकाच वेळी १२० पोलीस करत होते 'ऑपरेशन हनिमून'!
9
सॉफ्टवेअर इंजिनिअर झटक्यात कोडिंग करायला गेले अन् चॅटजीपीटी बंद पडले! भारतीय युजर वैतागले 
10
CM फडणवीसांची नितेश राणेंना कठोर शब्दांत समज; म्हणाले, “तुमच्या मनात काही असले तरी...”
11
...अन् १४ चिनी नागरिकांचा जीव वाचला; चीननं मानले भारतीय नौदल आणि मुंबई कोस्ट गार्डचे आभार
12
बालपणीचे मित्र, इंदूरमधला कॅफे...राजाच्या हत्येसाठी राजने ३ मित्रांना कसं तयार केले?
13
जग बेलआऊटवर बेलआऊट पॅकेज देतेय, पाकिस्तानी सैन्य ते पैसे खातेय; वर्ल्ड बँकेनेच पाकिस्तानला उघडे केले...
14
हनिमून ते राजाची हत्या...; मेघालय पोलिसांनी विचारलेल्या 'या' १३ प्रश्नांनी उडवली सोनमची झोप!
15
बाबो! बोल्ड फोटोज आणि व्हिडिओज विकून खुशीने कमावले तब्बल १० कोटी, म्हणाली...
16
MS धोनीसंदर्भात व्यक्त होताना शास्त्रींना आठवला 'पाकीटमार'; म्हणाले... (VIDEO)
17
सात जन्मांची साथ..., हत्या केल्यानंतर सोनमने राजाच्या अकाउंवरून शेअर केली अशी पोस्ट, पण ती एक चूक नडली, पोलिसांना आला संशय
18
खतरनाक! सोशल मीडियावर प्रसिद्ध होणं बेतलं १९ वर्षीय मुलीच्या जीवावर; काय आहे डस्टिंग चॅलेंज?
19
विजेच्या धक्क्याने बाप गेलाच, दोन्ही मुलं पाणी घेऊन आली अन् त्यांचेही आयुष्य संपलं!
20
'सोनम रघुवंशी म्हणत होती बिझी आहे, त्याला समजलंच नाही...!'; राजा रघुवंशीच्या मित्रानं केला मोठा खुलासा

स्वामी समर्थांचा अवतार मानणा-या श्रीकृष्ण पाटीलला अटक, महिलेला शिवीगाळ केल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2017 15:35 IST

बाबा गुरमीत राम रहीमची काळी कृत्ये दररोज बाहेर येत असताना आता लवकरच रत्नागिरीतील एका बाबावर अशीच कारवाईची कु-हाड कोळणार आहे.

ठळक मुद्देश्रीकृष्ण पाटील स्वत:ला स्वामी समर्थांचा अवतार समजतो. श्रीकृष्ण पाटीलची एक व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला.

रत्नागिरी, दि. 21 -  बाबा गुरमीत राम रहीमची काळी कृत्ये दररोज बाहेर येत असताना आता  रत्नागिरीतील एका बाबावर अशीच कारवाईची कु-हाड कोसळली आहे. श्रीकृष्ण पाटील असे या बाबाचे नाव असून, महिलेला अश्लील शिवीगाळ केल्या प्रकरणी पाटील बाबावर कारवाई होणार आहे. श्रीकृष्ण पाटील स्वत:ला स्वामी समर्थांचा अवतार समजतो. 

श्रीकृष्ण पाटीलची एक व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला. भक्तांना मार्गदर्शन करतानाही हा बाबा शिवराळ भाषा वापरायचा. रत्नागिरी पोलिसांनी या बाबाला अटक केली आहे. बुधवारी रात्री उशिरा त्याला रत्नागिरी शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आणि गुरुवारी सकाळी त्याला रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी अटक केली. स्वत:ला स्वामी समर्थांचा अवतार मानणारा हा बाबा पोलीस खात्यात नोकरीला होता. रत्नागिरीतल्या झरेवाडीमध्ये या बाबाचा मठ आहे. पोलीस दलातून निवृत्ती घेतल्यानंतर त्याने मठ स्थापन केला. 

पाटीलबाबा तथा पाटीलबुवा याचा एक व्हिडीओ गेले काही दिवस सोशल मीडियावर गाजत होता. या व्हिडिओमध्ये हा बाबा नटून थटून लोकांना सामोरा जात असल्याचे दिसत आहे. त्यात तो महिलांबाबत अर्वाच्च शब्दही वापरत आहे. स्वतःला स्वामी समर्थांचा अवतार समजणारा हा बाबा अनेक प्रकारचे दावे करत असल्याचेही या व्हिडिओमध्ये दिसत आहे. 

त्याआधारे अंधश्रद्धा निर्मूलन समितीसह सहा संस्थांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर केले. त्याचवेळी दोन महिलांनी पाटीलबाबा व त्याचा सहकारी रावराणे अशा दोघांवर विनयभंग आणि शिवीगाळीची फिर्याद दिली. त्याआधारे या बाबाला बुधवारी मध्यरात्रीनंतर शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याच्या आरोपावरुन त्याला अटक करण्यात आली आहे.