शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

कष्टकरी बापाच्या दाराला लेकींनी बांधलं तोरण! श्रद्धा, राजश्री बनल्या क्लास वन अधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2023 09:17 IST

‘श्रद्धा’चे वडील शंकर हे गडहिंग्लज साखर कारखान्यात तर ‘राजश्री’चे वडील मुंबईतील एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून कामाला आहेत.

- राम मगदूमलोकमत न्यूज नेटवर्कगडहिंग्लज (जि. कोल्हापूर) : कोल्हापूर जिल्ह्यातील लेकींनी कष्टकरी बापाच्या दाराला आपल्या यशाचं तोरणं बांधलं. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षेतून ‘कौलगे’ची श्रद्धा आणि ‘हिटणी’ची राजश्री दोघीही क्लास वन अधिकारी बनल्या.

‘श्रद्धा’चे वडील शंकर हे गडहिंग्लज साखर कारखान्यात तर ‘राजश्री’चे वडील मुंबईतील एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून कामाला आहेत. शिक्षणाची पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबातील दोघींनी केवळ जिद्दीच्या जोरावर उत्तुंग यशाला गवसणी घातली आहे. श्रद्धाने राज्यात मुलींमध्ये चौथा तर राजश्रीने सातवा क्रमांक पटकावला आहे.  

राजश्रीचे प्राथमिक शिक्षण हिटणीतील प्राथमिक शाळेत तर उच्च माध्यमिक शिक्षण जागृती प्रशालेत झाले. घाळी कॉलेजमधून तिने विज्ञान शाखेची पदवी घेतली. तिच्याच मार्गदर्शनामुळे भाऊ महेश याचीही नुकतीच विक्रीकर निरीक्षकपदी निवड झाली आहे. श्रद्धाचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण कौलगेतच झाले.

सध्या दोघीही उपशिक्षणाधिकारी..!श्रद्धा हिची रत्नागिरी येथे तर राजश्री हिची सांगली येथे उपशिक्षणाधिकारी म्हणून नेमणूक झाली आहे. रसायनशास्त्राच्या पदवीधर असणाऱ्या दोघीही राज्यसेवेच्या एकाच बॅचच्या असून, सध्या नागपूर येथे एकत्र प्रशिक्षण घेत आहेत.

यश अपेक्षित होतं. चांगल्या स्कोरमुळे क्लास वन पोस्ट नक्कीच मिळेल, अशी अपेक्षा होती. ते मिळाले, खूप आनंद झाला. - श्रद्धा शंकर चव्हाण (कौलगे) 

मेहनत सफल झाली. खूप आनंद झाला. आई-वडिलांच्या कष्टाचं चीज झालं.- राजश्री सिद्धाप्पा तेरणी (हिटणी)

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षा