शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या निकालाआधीच पवारांकडून विधानसभेची तयारी सुरू?; भाजपच्या माजी आमदाराने घेतली भेट
2
देशात इंडिया आघाडीचे सरकार येईल? काँग्रेसचे 'चाणक्य' डीके शिवकुमार यांनी केली ही भविष्यवाणी
3
'भाजपाला चिंतनाची गरज' म्हणणाऱ्या एकनाथ खडसेंना महाजनांनी सुनावलं, म्हणाले- "तुम्ही आधी सांगा..."
4
"मोदींची ध्यानधारणा हीदेखील 'मूक पत्रकार परिषद'च होती"; संजय राऊतांचा आयोगावर पलटवार
5
कशी होते मतांची मोजणी? EVM-VVPAT स्लिप्सचे काय होते? जाणून घ्या संपूर्ण ABCD...
6
निकालाआधीच कोल्हापूरात विजयाची चर्चा, शाहू महाराजांचे झळकले पोस्टर
7
पुलवामामध्ये मोठी चकमक; टॉप कमांडर रियाझ अहमद डारसह आणखी एकाला कंठस्थान
8
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा Exit Poll आला; इंडिया आघाडीला किती जागा मिळणार, पाहा...
9
कार जाऊ द्या, आता बाईकमध्येही आली 'एअरबॅग'; होंडाच्या या दुचाकीचा किंमत किती माहित्येय?
10
भारतात आल्यावर पहिल्यांदा मृणाल दुसानीसने या पदार्थावर मारला ताव
11
मोदी तिसऱ्यांदा सत्तेत आले तर काहीतरी भव्य दिव्य होणार; 10 हजार पाहुणे, स्थळ अन् तारीखही ठरली...
12
आरोग्यासाठी फायदेशीर असणारं लिंबू पाणी नेमकं कधी प्यावं?; जाणून घ्या, योग्य वेळ
13
शेअर बाजार 'रेकॉर्ड हाय'वर बंद; 'Modi Stocks'नं एकाच दिवसात केलं मालामाल, अदानींचे शेअर्स रॉकेट
14
लोकसभा निकालाआधीच बॉलिवूडमध्ये मोदींचा डंका! 'या' खानने BJP चं केलं अभिनंदन, म्हणाला...
15
'मोदी 3.0', Exit Poll वर पाकिस्तान, रशिया, चीन, सौदीसह जगभरातील मीडियाने काय म्हटले?
16
लोकसभेच्या निकालाआधीच उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; निवडणूक आयोगाचे कारवाईचे आदेश
17
"भाजपाने सत्तेसाठी इतरांची सरकारं पाडली, कुटुंबांमध्ये भांडणं लावली"; अखिलेश यादवांची टीका
18
धावत्या CNG कारला लागली आग; 4 जणांचा होरपळून मृत्यू, नेमकी कुठे चूक झाली..?
19
दलजीतविरोधात निखिल पटेलची कायदेशीर कारवाई, पत्नीला थेट इशारा देत म्हणाला...
20
सरकार बनताच अॅक्शन मोडमध्ये येणार मोदी! बँकेसह या कंपनीतील हिस्सा विकण्याचा प्लान; शेअर्स बनले रॉकेट

‘दिल्ली आंदोलनात शेतक-यांनी एकजूट दाखवा’ - समाजसेवक अण्णा हजारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 1:42 AM

शेतक-यांच्या अनेक संघटना वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करीत आहेत. त्यामुळे शेतक-यांची शक्ती विखुरली जाते. त्याचा परिणाम मागण्या मान्य होण्यात अडचणी येतात. सर्व शेतकरी संघटनांनी व शेतक-यांनी एकत्र येऊन लढा देण्याची वेळ आहे.

राळेगणसिद्धी (अहमदनगर) : शेतक-यांच्या अनेक संघटना वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करीत आहेत. त्यामुळे शेतक-यांची शक्ती विखुरली जाते. त्याचा परिणाम मागण्या मान्य होण्यात अडचणी येतात. सर्व शेतकरी संघटनांनी व शेतक-यांनी एकत्र येऊन लढा देण्याची वेळ आहे. नवी दिल्लीत शहीद दिनापासून (२३ मार्च) सुरू होणा-या लोकपाल व शेतक-यांच्या प्रश्नांवरील सत्याग्रह आंदोलनात शेतक-यांनी एकजुटीने सहभागी व्हावे. ‘एक देश, एक शेतकरी, एक आवाज,’ अशी एकजूट शेतक-यांनी दाखवावी, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले आहे.अण्णांनी शुक्रवारी राळेगणसिद्धी येथून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे शेतक-यांशी संवाद साधला. मंत्र्यांना शेतीचा अनुभव नसल्यामुळेच कृषिप्रधान भारत देशात शेतकºयांचे प्रश्न गंभीर झाले असल्याची टीका अण्णांनी केली.शेतक-यांच्या शेतमालाला उत्पादनखर्चावर आधारित हमीभाव द्यावा, याचा अहवाल सरकारला पाठविला होता. त्यातही सरकारने शेतक-यांचा अर्धा हिस्सा कमी केला, हा शेतक-यांवर अन्याय आहे. शेतकºयांच्या मुलांना नोक-या नाहीत. बँकाही सहजासहजी कर्जे शेतक-यांना देत नाहीत. तर काही बँका शेती कर्जावार चक्रवाढ पद्धतीने व्याज आकारणी करतात. बँक कायद्याप्रमाणे असे करणे चुकीचे असले तरी केंद्र सरकारचा अर्थविभाग व रिझर्व्ह बँकेचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने शेतक-यांवर अन्याय होत आहे, असेही अण्णा हजारे म्हणाले.

टॅग्स :anna hazareअण्णा हजारे