शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
2
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
3
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
4
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
5
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
6
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
7
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
8
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
9
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
10
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
11
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
12
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
13
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
14
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
15
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
16
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
17
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
18
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका
19
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
20
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा

हिंदुस्थानच्या हातात बांगड्या नव्हेत, भीमाची गदा आहे हे पाकिस्तानला दाखवा - उद्धव ठाकरे

By admin | Updated: September 21, 2016 08:36 IST

लातों के भूत बातों से नहीं मानते, हिंदुस्थानच्या हातात भीमाची गदा आहे, बांगड्या नाहीत हे दाखवा, असे सांगत पाकिस्तानचा बदला घ्या अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २१ -  ' लातों के भूत बातों से नहीं मानते. निर्लज्ज व कोडग्यांना शब्दांच्या माराने काय धडा मिळणार? असे विचारत पाकिस्तानवर कारवाई करत बदला घ्या!' असा सल्ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारला दिला आहे.  ' हिंदुस्थानच्या हातात भीमाची गदा आहे, बांगड्या नाहीत हे दाखवा. बदला घ्या! खरंच बदला घ्या!' असे उद्धव यांनी सामनाच्या अग्रलेखातून म्हटले आहे. 
दोन दिवसांपूर्वी काश्मीरमधील उरी येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एकूण १९ जवान शहीद झाले. त्याच पार्श्वभूमीवर देशभरातून पाकिस्तानवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. भाजपाचा मित्रपक्ष व सत्तेतील सहकारी असणा-या शिवसेनेनेही देशवासियांची मागणी लावून धरत पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी केली आहे.'पठाणकोट हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्याची गर्जना पंतप्रधान आणि लष्करप्रमुखांनी केली होती. तीच डफली आता वाजवली जात आहे. पण पाकिस्तानला धडा शिकवणार म्हणजे नक्की काय करणार' असे उद्धव यांनी विचारले आहे. ' पठाणकोटच्याबाबतीत जे घडले नेमके तसेच ‘उरी’च्या बाबतीत तेच घडणार असेल तर बदल्याची व कारवाईची मर्दानी भाषा कोणी करू नये' असा टोलाही उद्धव यांनी मारला आहे. 
 (अमेरिकेसारखी हिम्मत दाखवणार नसाल तर, मोदी सरकार तुमचा काय फायदा ? - उद्धव ठाकरे)
(दहा घुसखोरांचा सीमेवरच खात्मा)
  •  
 
  •  
 
अग्रलेखातील महत्वाचे मुद्दे : 
- हिंदुस्थानवर संकटाचा पहाड कोसळला आहे. अशावेळी राजकीय मतभेदांना गाडून सरकारच्या पाठीशी ठाम उभे राहण्याची गरज आहे. कश्मीरात पाकड्या अतिरेक्यांच्या हल्ल्यात १८ जवानांचे मरण ओढवले. या बलिदानाने देश सुन्न झाला आहे व धक्क्यातून अद्यापि सावरलेला नाही. संताप आणि आक्रोश यामुळे देशात उद्रेकाचे वातावरण निर्माण झाले आहे, ते शांत कसे करणार हा प्रश्‍न आहे. पाकिस्तानला धडा शिकवू, उरीतील घटनेचा बदला घेऊ, हल्लेखोरांना सोडणार नाही, असे आमच्या पंतप्रधानांनी सांगितले आहे. त्याबद्दल आम्ही त्यांचे अभिनंदन करतो आणि पाकिस्तानला धडा शिकविण्याचे बळ त्यांना लाभो अशी आई जगदंबेचरणी प्रार्थना करतो, पण पाकिस्तानला धडा शिकवणार म्हणजे नक्की काय करणार? पठाणकोटवरील हल्ल्यानंतरही अशाच प्रकारची वक्तव्ये जोरकसपणे करण्यात आली होती, त्याचे काय झाले? पाकिस्तानला धडा शिकविण्याचे बाजूला राहिले व त्यांच्याशी प्रेमालाप सुरू झाला. पठाणकोटचे बलिदान जणू व्यर्थ गेले. 
- जागतिक पातळीवर पाकिस्तानचा मुखवटा फाडू व त्यांचा खरा चेहरा उघडा करू, असे पठाणकोटच्या वेळी सांगितले. तीच ‘डफली’ आता वाजवली जात आहे. पठाणकोटवरील हल्ल्याचा शोध घेण्यासाठी पाकिस्तानचे तपास पथक पंजाबात येऊ दिले व त्यातला एक जण ‘आयएसआय’वाला होता. हिंदुस्थानच्या अधिकार्‍यांनी त्यांना पठाणकोटवरील हल्ल्यात पाकचा हात असल्याचे पुरावे दिले, पण त्या नापाक लोकांनी ते मानले नाहीत व हिंदुस्थानच्या इभ्रतीचा तमाशा केला. आता ‘उरी’च्या बाबतीत नेमके तेच घडणार असेल तर बदल्याची व कारवाईची मर्दानी भाषा कोणी करू नये. 
- आमच्या देशात कारवाई कोणावर होते, तर साध्वी प्रज्ञा सिंगवर होते. कश्मीरात अतिरेक्यांशी लढणार्‍या कर्नल श्रीकांत पुरोहित यांच्यावर होते. दहशतवादविरोधी पथके ‘सनातन’सारख्या आश्रमात जाऊन वृद्ध, अपंग साधकांचा छळ करतील. हिंदुत्ववाद्यांवर, प्रखर राष्ट्रभक्तांवर कठोर कारवाई करण्याची एकही संधी ही मंडळी सोडणार नाहीत, पण १८ जवानांचे बळी घेणार्‍या पाकड्यांवर म्हणावी तशी कठोर कारवाई होत नाही. ती आता तरी होईल अशी अपेक्षा आहे. पठाणकोटवरील हल्ल्यानंतर आमच्या लष्करप्रमुखांनीही खणखणीत शब्दांत सांगितलेच होते की, ‘‘पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत उत्तर देऊ. बदला घेऊ. वेळ, दिवस आणि जागा आम्ही ठरवू!’’ आज उरीतील भयंकर घटनेनंतरही ले. जनरल रणबीर सिंग यांनी तेच प्रखर शब्द वापरले. ‘‘बदला घेऊ. वेळ, दिवस, जागा आम्ही ठरवू!’’ 
- १२५ कोटी जनता त्या दिवसाची व क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहे. करा! करा! काहीतरी करा! बदला घ्या! महाभारतात भीम किचकाची मांडी फोडून घटाघटा रक्त प्यायला होता तसा बदला घ्या. किचकाने द्रौपदीस मांडी दाखवून अपमानित केले. त्याचा बदला भीमाने घेतला. हिंदुस्थानच्या हातात भीमाची गदा आहे, बांगड्या नाहीत हे दाखवा. बदला घ्या! खरंच बदला घ्या! पाकिस्तान आतंकवादी देश आहेच. त्यास आतंकवादी देश घोषित करण्याचा व्यर्थ खटाटोप कशाला? पाकिस्तान कंगाल व भिकारी आहेच. त्याच्यावर आर्थिक निर्बंधांची गुळणी टाकून काय होणार? जगात पाकिस्तानचा चेहरा कधीच उघडा झाला आहे. आता पुन्हा तोच चेहरा खरवडून काय हाती लागणार? संयुक्त राष्ट्रसंघात परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज पाकिस्तानवर हल्ला करणार आहेत. हे यापूर्वी अनेकदा झाले. निर्लज्ज व कोडग्यांना शब्दांच्या माराने काय धडा मिळणार? लातों के भूत बातों से नहीं मानते. कृती करा! बदला घ्या! १८ जवानांच्या कुटुंबांचा, १२५ कोटी जनतेचा हाच आक्रोश आहे!