शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
4
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
5
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
6
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
7
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
8
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
9
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
10
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
11
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
12
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
13
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
15
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
16
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
17
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
18
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
19
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
20
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक

राज्यात ३५ एसटी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; निलंबित कर्मचाऱ्यांपैकी ११ बडतर्फ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2021 06:45 IST

आता एसटी कर्मचाऱ्यांना थेट बडतर्फ करण्याची कारवाईदेखील सुरू करण्यात आली आहे.

मुंबई : विलीनीकरणाच्या मागणीसाठी राज्यात संपात सहभागी असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर एसटी महामंडळाने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. जे एसटी कर्मचारी कामावर रुजू होत नाहीत, त्यांच्यावर एसटी महामंडळ निलंबन, सेवा समाप्ती आणि बदलीची कारवाई करत होते. मात्र, आता एसटी कर्मचाऱ्यांना थेट बडतर्फ करण्याची कारवाईदेखील सुरू केली आहे.

राज्यात एसटी महामंडळाच्यावतीने गुरुवारी ३५ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे; तर निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यांपैकी ११ कर्मचाऱ्यांना गुरुवारी बडतर्फ करण्यात आले. तसेच गुरुवारी राज्यातील १६९ एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले; तर १२ एसटी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त झाली; तर १४० कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. यामुळे आतापर्यंत एकूण १० हजार ६५० एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन झाले असून, २०५५ कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त झाली आहे, तर २७६४ कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली आहे.

संपात ७६,७६५ सहभागीसध्या ७६ हजार ७६५ कर्मचारी संपात सहभागी असून, त्यांच्यापैकी एकूण २९२ जणांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे; तर एकूण २२ जणांना बडतर्फ करण्यात आले आहे. सरकारने आमच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली, तरी जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत , पर्यंत आम्ही मागे हटणार नाही, असे संपकरी कामगारांचे म्हणणे आहे.

टॅग्स :ST Strikeएसटी संपMaharashtraमहाराष्ट्र