शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ऐन सणासुदीत गॅस सिलिंडरचा तुटवडा

By admin | Updated: January 15, 2015 00:56 IST

कृत्रिम टंचाई निर्माण करून काळ्या बाजारात सुरू असलेल्या घरगुती गॅस सिलिंडरच्या विक्रीकडे शासनाच्या अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने ऐन थंडीच्या दिवसात आणि सणासुदीत घरगुती

काळ्या बाजारात विक्री : हॉटेल्स व चारचाकी वाहनांमध्ये वापरनागपूर : कृत्रिम टंचाई निर्माण करून काळ्या बाजारात सुरू असलेल्या घरगुती गॅस सिलिंडरच्या विक्रीकडे शासनाच्या अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने ऐन थंडीच्या दिवसात आणि सणासुदीत घरगुती गॅस सिलिंडरची चणचण जाणवत आहे. आॅनलाईन नोंदणी केल्यानंतरही एजन्सीसमोर ग्राहकांच्या रांगा दिसून येत आहे. थंडीच्या दिवसात घरगुती गॅस सिलिंडरला जास्त मागणी असते. वीज परवडत नसल्याने गॅसच्या गिझरचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. काळ्या बाजारात एक हजारात सिलिंडर विकल्या जात आहे. शहरातील सर्वच हॉटेल्स, टपरी आणि चारचाकी वाहनांमध्ये घरगुती गॅसचा सर्रास वापर सुरू आहे. त्यामुळे सिलिंडरच्या डिलेव्हरीला तब्बल १५ दिवस लागत आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, कंपनीतर्फे गॅसचा सुरळीत पुरवठा सुरू आहे. टंचाई कशामुळे होत आहे, याची शहानिशा करावी लागेल. अधिकाऱ्यांना न घाबरता डिलेव्हरी बॉय रस्त्यावर गाड्या उभ्या करून एक हजारात सिलिंडरची विक्री करीत असल्याचे दिसून येते. एजन्सीच आम्हाला सिलिंडर विक्रीसाठी उपलब्ध करून देतात, असे डिलेव्हरी बॉयचे म्हणणे असल्याने त्यांची हिंमत वाढली आहे. (प्रतिनिधी)प्रशासनाने लक्ष द्यावेव्यावसायिकांना मात्र जादा पैसे देऊन घरगुती सिलिंडर वेळेवर मिळत आहे. परंतु सर्वसामान्य नागरिकांना जादा पैसे देऊनही सिलिंडर मिळणे अवघड झाले आहे. सिलिंडर वितरण व्यवस्थेकडे महसूल प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. परंतु ही जबाबदारी संबंधित अधिकारी घेण्यास टाळाटाळ करीत आहे. अर्थपूर्ण व्यवहार होत असल्यामुळे डोळेझाक होत आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांमधून प्रशासनाच्या गलथान कारभारावर तीव्र संताप व्यक्त होत आहे. वितरक आणि ग्राहकांमध्ये वाद सुरू असल्याचे सर्व दिसून येत आहे. ‘गाडी आली नाही’ असे सांगून सिलिंडर नाकारले जात आहे. गॅस एजन्सींनी आपले मनमानी धोरण राबवून ग्राहकांची अडवणूक सुरू केली असून त्याला नियंत्रण बसायला हवे, असे मत एका ग्राहकाने लोकमतशी बोलताना व्यक्त केले.वाहनांमध्ये घरगुती गॅसघरगुती ग्राहकांना स्वयंपाकासाठी गॅस सिलिंडर उपलब्ध होत नसताना, वाहनधारक व व्यावसायिक वापरासाठी मात्र या गॅसचा सर्रास उपयोग सुरू असल्याचे दिसून येते. शहरात गॅसचे पंप फार कमी आहेत. त्यातुलनेत गॅसवर धावणाऱ्या गाड्या जास्त आहेत. जीवनावश्यक कायद्यांतर्गत स्वयंपाकासाठी वापरला जाणारा गॅस वाहनांमध्ये वापरता येत नाही. टपरीचालक, चहाची दुकाने, कॅन्टीन, उपाहारगृह आणि हॉटेल्समध्ये घरगुती सिलिंडरचा उघड वापर केला जात आहे.२४२२ रुपयात नवे गॅस कनेक्शन!हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत गॅस, इंडियन आॅईल या तिन्ही कंपन्यांतर्फे १ जानेवारी २०१५ पासून सबसिडीचे नवीन घरगुती गॅस कनेक्शन देणे सुरू आहे. काही कागदपत्रांची पूर्तता करून ग्राहकाला नवीन कनेक्शन केवळ २४२२ रुपयात मिळणार आहे. त्यात एजन्सीकडून गॅस शेगडी घेणे बंधनकारक नाही. ग्राहकाला हक्काची सेवा पुरविण्यात एजन्सी सक्षम नसेल तर त्या एजन्सीची तक्रार कंपनीकडे करता येईल. कनेक्शन संपल्याची कारणे देऊन कनेक्शन नाकारणाऱ्या एजन्सींवर तातडीने कारवाई करण्यात येईल, असे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सेवा न देणाऱ्या एजन्सीची ग्राहकांनी कंपनीकडे बेधडक तक्रार करावी, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.