शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

शॉकिंग...एका महिन्याचे लाईट बिल तब्बल २ कोटी; उद्योजकाची झोपच उडाली, नेमकं काय घडले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 17:51 IST

याच उद्योगाला गेल्यावर्षी मे २०२४ या महिन्याचे वीजबिल एक लाख ८० हजार ३९८ रुपये आले असताना यावर्षी मे महिन्यात एवढी वाढ कशी, यामुळे उद्योजक चक्रावले

जळगाव - महावितरण कंपनीच्या सॉफ्टवेअरमधील तांत्रिक बिघाडामुळे अनेक उद्योगांचे एका महिन्याचे वीजबिल ६० ते ७० लाखांदरम्यान आले आहे. एका उद्योगाचे तर तब्बल दोन कोटी रुपये बिल आल्याने या वाढीव बिलामुळे उद्योजक चिंतेत पडले आहेत. शिवाय बिल भरण्याची मुदत २१ जून असल्याने तोपर्यंत बिल दुरुस्ती न झाल्यास उद्योगांना आर्थिक भुर्दंड बसणार आहे. औद्योगिक वसाहतीत विविध सेक्टरमध्ये मे महिन्याचे वीजबिल देण्यात आले आहे.

उद्योजकांना मनस्ताप 

वाढीव वीज बिलांविषयी उद्योजकांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने बिल वाढले आहे, असे सांगण्यात आले. वीज भरणा करण्याची मुदत तीन दिवसांवर आल्याने त्यापूर्वी वीजबिलामध्ये दुरुस्ती न झाल्यास दंडाचा भुर्दंड बसण्यासह उद्योजकांना 'रिबेट'ही मिळणार नाही. अचानक १५ ते २० पटींनी बिल आल्याने उद्योजकांनी महिनाभरातील वीजवापराची माहिती घेतली. मात्र, दरमहा असणाऱ्या सरासरीएवढाच वीजवापर झाल्याचे आढळून आले.

अपडेशनमध्ये तारखा जुळेना म्हणून अडचण

महावितरणच्या सॉफ्टवेअरमधील समस्येमुळे तारखा जुळत नसल्याने वाढीव बिलाची अडचण येत असल्याची माहिती महावितरणच्यावतीने देण्यात आली आहे. या समस्येसंदर्भात महावितरण एमआयडीसी भागातील अभियंता यांच्याशी संपर्क साधला असता 'आपण बैठकीला आलो असून, याविषयी माहिती देता येणार नाही', असे त्यांनी सांगितले. या शिवाय महावितरण अर्बन १ चे अधिकारी आढाव यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही. उद्योजकांना मनस्ताप सहन करावा लागत असताना अधिकारी मात्र बोलायला तयार नाहीत, असे दिसले.

दोन त चार लाखाचे बिल थेट ६४ लाखांवर

अचानक वाढून आलेल्या या बिलांची स्थिती पाहिली तर एरवी दोन ते चार लाखांदरम्यान बिल येणाऱ्या एका प्लास्टिक उद्योगास मे महिन्याचे तब्बल ६३ लाख ३९ हजार २४० रुपये वीजबिल आले आहे. बिल मुदतीत न भरल्यास त्यावर एक लाख १२ हजार ८६७ रुपये दंड सहन करावा लागणार आहे. याच उद्योगाला गेल्यावर्षी मे २०२४ या महिन्याचे वीजबिल एक लाख ८० हजार ३९८ रुपये आले असताना यावर्षी मे महिन्यात एवढी वाढ कशी, यामुळे उद्योजक चक्रावले. वाढीव बिलासंदर्भात उद्योजक अशोक मुंदडा यांनी महावितरणकडे लेखी तक्रार केली असून यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याची मागणी केली आहे.

वीज बिलामध्ये काही चुकलेले असेल तर संबंधित ग्राहकांनी महावितरणच्या कार्यालयात संपर्क साधावा. जर बिलामध्ये काही चूक असेल तर त्यात दुरुस्ती करून दिली जाईल. - डॉ. मोहन दिवटे, जनसंपर्क अधिकारी, महावितरण. 

टॅग्स :mahavitaranमहावितरण