नाशिक : सटाणा तालुक्यातील एक पाच महिन्यांच्या गर्भवती विवाहितेने गर्भपात करण्यास नकार दिल्याने पती, दीर, सासरा यांनी तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. त्या विवाहितेवर शारीरिक व मानसिक अत्याचार करत अंगावर पेट्रोल ओतून तिला जाळण्याचा प्रयत्न केला. पीडित रुपाली विलास कुमावत (रा.अंबिकानगर, सटाणा) यांनी दिलेल्या फिर्यादी वरून पोलिसांनी विलास दशरथ कुमावत, योगेश दशरथ कुमावत, दशरथ गंगाधर कुमावत या तिघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यापैकी एकाही संशयितला अद्याप अटक झालेली नाही. योगेश याने पीडित महिलेवर पेट्रोल ओतले व पती विलास याने आगपेटीची काडी लावली, असे फिर्यादीत म्हटले आहे. पीडित रुपाली 55 टक्के भाजली असून, तिला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती नाशिक ग्रामीण पोलिसांनी दिली आहे. पुढील तपास व संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत.
धक्कादायक ! पाच महिन्यांच्या गर्भवतीला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2018 16:32 IST