पंढरपूर येथील चंद्रभागा नदीत बुडून तीन महिलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी सकाळी घडली. या तीन महिला जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील धावडा गावच्या असल्याची माहिती पुढे आली आहे.
दरम्यान, संगीताबाई संजू सपकाळ (वय ४२), सुनीताबाई महादू सपकाळ (वय ३८) अशा मृत महिलांची नाव आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, भोकरदन तालुक्यातील धावडा या गावातील महिला पंढरपूर येथील विठ्ठल - रुक्मिणीच्या दर्शनासाठी आल्या होत्या. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास त्या तिघी पुंडलिक मंदिर शेजारी असलेल्या नदीमध्ये आंघोळ करण्यासाठी उतरल्या. पाण्याचा अंदाज न आल्याने त्या तिघी बुडाल्या. या घटनेची नोंद पंढरपूर पोलीस ठाण्यात झाली आहे.