शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक वास्तव : गेल्या अडीच वर्षांत १८ वाघांची शिकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 05:14 IST

जय वाघ व अवनी वाघिणीच्या मृत्यूवरून राजकारण तापले असतानाच २०१७ पासून ३१ महिन्यांत राज्यात १८ वाघांची शिकार करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे यातील सर्वच प्रकरणे विदर्भातील आहे.

नागपूर : जय वाघ व अवनी वाघिणीच्या मृत्यूवरून राजकारण तापले असतानाच २०१७ पासून ३१ महिन्यांत राज्यात १८ वाघांची शिकार करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे यातील सर्वच प्रकरणे विदर्भातील आहे.अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत प्रधान मुख्य वन संरक्षक कार्यालयाकडे विचारणा केली होती. राज्यात किती वाघांचा मृत्यू झाला, यातील शिकारीची प्रकरणे किती होती, आरोपींविरोधात काय कारवाई झाली, इत्यादी प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार १ जानेवारी २०१७ ते ३१ जुलै २०१९ या कालावधीत महाराष्ट्रातील १८ वाघांची चक्क शिकार करण्यात आली. यात दहा वाघ, सहा वाघिणी तर दोन बछड्यांचा समावेश होता. २०१७ साली ९, २०१८ मध्ये ३ व २०१९ मध्ये ६ वाघांची शिकार झाली. आठ वाघांना विद्युत प्रवाहाद्वारे, आठ वाघांना विषप्रयोग करून मारण्यात आले, तर दोघांची प्रत्यक्ष शिकार करण्यात आली.नागपूर वनक्षेत्रात सर्वाधिक आठ शिकारीया घटना नागपूर, चंद्रपूर, अमरावती किंवा गडचिरोली वनक्षेत्रातच झाल्या आहेत. सर्वात जास्त आठ शिकारी नागपूर वनक्षेत्रात झाल्या. आठ वाघांची शिकार चंद्रपूर वनक्षेत्रात झाली. प्रत्येकी एका वाघाची शिकार गडचिरोली व अमरावती वनक्षेत्रात झाली.

टॅग्स :TigerवाघMaharashtraमहाराष्ट्र