शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: धक्कादायक अंदाज! संभाव्य तिसऱ्या लाटेत सक्रिय रुग्णसंख्या आठ लाखांच्या घरात जाण्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2021 08:31 IST

वैद्यकीय तज्ज्ञांचे निरीक्षण; मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत आरोग्य विभागाची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत अतिशय कमी कालावधीत रुग्ण संख्या दुप्पट झाली. नव्या डेल्टा प्लस व्हेरियंटचाही धोका असल्याने तिसरी लाट आल्यास राज्यात रुग्ण संख्या पुन्हा दुपटीने वाढू शकते. पहिल्या लाटेत १९ लाख रुग्ण होते, दुसऱ्या लाटेत ही संख्या ४० लाखांपेक्षा जास्त झाली. आता संभाव्य तिसऱ्या लाटेत सक्रिय रुग्णांची संख्या ही ८ लाख होऊ शकते, तसेच १० टक्क्यांच्या आसपास संसर्गग्रस्त मुलांची संख्या असू शकते, असे आरोग्य विभागाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीतील सादरीकरणात सांगितले.

महाराष्ट्र टास्क फोर्सचे सदस्य असलेले डॉ. शंशाक जोशी म्हणाले, यूके (ब्रिटन) तिसऱ्या लाटेचा सामना करीत आहे. फक्त एका आठवड्यातच दुसऱ्या लाटेइतका प्रादुर्भाव या लाटेचा झाला आहे. योग्य खबरदारी न घेतल्यास आपल्यालाही अशाच परिस्थितीला सामोरे जावे लागेल. संसर्गजन्य रोगांवरील शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार, साधारण १०० दिवस ते आठ आठवड्यांत या लाटेचे पीक येऊ शकते. आम्हाला विश्वास आहे की, संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका नसेल. मागील दोन लाटांदरम्यान ज्याप्रमाणे रुग्णांची टक्केवारी होती, त्याचप्रमाणे या वेळी ही टक्केवारी ३.५ पेक्षा अधिक नसेल.

‘लसीकरणावर भर द्या’n कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका पाहता आधीपासूनच तयारी करण्यास राज्य सरकारने सुरुवात केली आहे. शहरी आणि ग्रामीण भागात पुरेशा प्रमाणात औषधांचा साठा आहे की नाही ते पाहावे, अशी सूचना दिली आहे. n सोबतच टास्क फोर्समधील डॉक्टर्स, वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्येही बैठक पार पडली आहे. टास्क फोर्सच्या डॉक्टरांना सिरो सर्व्हे करण्यासह मोठ्या प्रमाणात लसीकरण पार पडण्यावर भर देण्यास सांगितले आहे.

राज्यात दोन कोटी ६७ लाख लाभार्थ्यांना लसमुंबई : राज्यात दिवसभरात दोन लाख ३४ हजार ३५८ लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे; तर आतापर्यंत २ कोटी ६७ लाख २० हजार १७ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे. राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील २६ लाख ९४ हजार ७३० लाभार्थ्यांना लसीचा पहिला डोस २ लाख ११ हजार ४०९ लाभार्थ्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक