शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक; महाराजांनीच केला महाराजांचा खून, पंढरपुरातील घटना

By appasaheb.patil | Updated: January 7, 2020 18:59 IST

मठाधिपती निवडीवरून झाला खून; ह़भ़प जयवंत महाराज पिसाळ यांचा झाला खून

ठळक मुद्दे- पंढरपूर शहरातील कराडकर मठातील घटना- घटनेनंतर पोलीसांनी घेतली घटनास्थळी धाव- मठाधिपती निवडीवरून वाद झाल्याची माहिती आली समोर

सोलापूर : पंढरपूर शहरातील कराडकर मठात मठाधिपती निवडीवरून गोंधळ झाला़ या गोंधळात महाराजांनीच महाराजांचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार ह.भ.प जयवंत महाराज पिसाळ यांचा खून झाल्याची माहिती समोर आली आहे़ या घटनेची माहिती मिळताच पंढरपूर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

पंढरपूर येथील कराडकर महाराज मठाचे मठाधिपती जयवंत पिसाळ यांची हत्या करण्यात आली आहे. बाजीराव जगताप यांनी ही हत्या केली असून मठाधिपतीच्या वादातूनच हा प्रकार घडला असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ सागर कवडे यांनी दिली आहे.

पंढरपूर येथे राज्यातील अनेक महाराजांचे मठ आहेत. यातील कराड येथील कराडकर महाराज मठामध्ये हत्या करण्यात आली असल्याचं समोर आले आहे. चाकूने वार करत ही हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

जयवंत पिसाळ कराडकर महाराज मठाचे मठाधिपती होते. मात्र या मठाच्या मठाधिपतीमध्ये वाद होता. अशातच आज कराडकर महाराज मठात एक मृतदेह पडला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तात्काळ पोलीस घटनास्थळी पोहोचले. मृतदेह मठाधिपती पिसाळ महाराजांचा असल्याचं समोर  आलं. पोलिसांनी तपास केला असता बाजीराव जगताप आणि जयवंत पिसाळ यांचात वाद होता अशी माहिती समोर आली. त्यावरून पोलिसांनी बाजीराव जगताप यांना ताब्यात घेतले असता अधिक चौकशी केली असता हत्या केल्याची कबुली जगताप यांनी दिली. जगताप यांनी यापूर्वी कराडमध्ये एकजणाच्या डोक्यात वीणा घातली होती.

या प्रकरणी बाजीराव जगताप यांच्याविरोधात पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. असे असले तरी शहारातील मठाधिपती यांची हत्या आणि मठातील वाद चव्हाट्यावर आल्याने उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.

 

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरMurderखूनPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस