शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
3
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
4
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
5
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
6
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
7
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
8
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
9
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
10
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
11
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
12
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
13
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
14
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
15
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
16
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
17
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
18
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
19
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
20
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द

सात दिवसांत धक्कादायक खुलासे

By admin | Updated: September 9, 2014 01:15 IST

केवळ लकडगंज परिसरच नव्हे तर नागपूरकरांना थरारून सोडणाऱ्या युग मुकेश चांडक हत्याकांडाला आता एक आठवडा पूर्ण झाला आहे. या प्रकरणाचा सूत्रधार राजेश दवारे आणि अरविंद सिंग या दोघांनी

झटपट श्रीमंतीचा हव्यास : आरोपींकडून दिशाभूलनागपूर : केवळ लकडगंज परिसरच नव्हे तर नागपूरकरांना थरारून सोडणाऱ्या युग मुकेश चांडक हत्याकांडाला आता एक आठवडा पूर्ण झाला आहे. या प्रकरणाचा सूत्रधार राजेश दवारे आणि अरविंद सिंग या दोघांनी गेल्या सोमवारी (१ सप्टें. २०१४) निरागस युगचे अपहरण करून त्याची हत्या केली होती.२ सप्टेंबरला रात्री या थरारक प्रकरणाचा उलगडा झाला. त्यानंतर पोलिसांनी राजेश आणि अरविंदला अटक केली. सध्या ते लकडगंज पोलिसांच्या कस्टडीत आहेत.या प्रकरणाचा सूत्रधार राजेश दवारे याने गेल्या सात दिवसात अनेक धक्कादायक बाबींचा खुलासा केला. ते पाहता तो नवखा गुन्हेगार आहे, यावर पोलिसांचा विश्वासच बसत नाही. झटपट श्रीमंतीचा हव्यास बाळगून असणारा राजेश धन्नालाल दवारे (वय १९) याचे वय आणि शरीरयष्टी बघता तो एवढे थरारक हत्याकांड घडवू शकतो, यावर कुणाचाच विश्वास बसत नाही. पोलिसांनी त्याला प्रारंभी ताब्यात घेतले तेव्हा सहज चौकशीचा भाग म्हणून पोलिसांनी त्याला विचारपूस केली. मात्र, ज्याला विचारपूस करून पोलिसांनी काही वेळेनंतर मोकळे केले, तो एवढा क्रूर असेल आणि तो इतके भयंकर कटकारस्थान रचू शकतो, याची पोलिसांनी कल्पनाच केली नव्हती. मात्र, त्याच्या सैतानी विचाराने पोलिसही चक्रावले आहेत. त्यामुळे एखाद्या सराईत गुन्हेगाराला बोलते करण्यासाठी जी पद्धत वापरली जाते, त्याच पद्धतीने राजेशलाही विचारणा केली जाते. खंडणी कशी उकळायची ? चांडक यांच्याकडून युगच्या बदल्यात करोडोंची खंडणी मिळेलच,असा ठाम विश्वास राजेश दवारेला होता. त्यामुळे त्याने युगच्या अपहरणाचा, अपहरण केल्यानंतर खंडणी कशी मागायची त्याचा आणि खंडणी देणारा काय म्हणू शकतो, त्याचाही विचार करून ठेवला होता. म्हणूनच १ सप्टेंबरला दुपारी ३.३० पासूनच युग शाळेतून आला की नाही, त्याची राजेशने डॉ. चांडक यांच्या घरी आणि क्लिनिकमध्ये फोन करून शहानिशा केली होती. अपहरण केल्यानंतर जास्त वेळ युगला सोबत ठेवणे शक्य नव्हते, हे तो जाणून होता. कारण, युग चंचल स्वभावाचा होता. त्याने आरडाओरड केली असती, पळून जाण्याचेही प्रयत्न केले असते, त्यामुळे युगची हत्या करण्याचा कट त्याने पक्का केला होता. हत्या करून खंडणी मागितल्यानंतर डॉ. चांडक हे युग ताब्यात असल्याचा पुरावा मागतील, तर त्यांची कशी दिशाभूल करायची, याचीही योजना त्याने बनविली होती. म्हणूनच युगची हत्या केल्यानंतर त्याचा शर्ट राजेशने काढून घेतला होता. हा शर्ट दाखवायचा आणि डॉ. मुकेश चांडक यांच्याकडून खंडणी वसूल करायची, अशी त्याची योजना होती. खंडणी घेताना पकडले जाण्याचा धोका होता. म्हणून तो डॉ. चांडक यांना धावत्या ट्रेनमधून नोटांची बॅग निर्जन ठिकाणी फेकायला सांगणार होता. ट्रेन समोर निघून जाईल आणि आपल्याला झटक्यात पाच-दहा कोटी रुपये मिळतील, कुणाला आपण दिसणारही नाही, असा त्याचा अंदाज होता. मात्र, घटनेच्या काही वेळेतच त्याला पोलीस ठाण्यातून फोन आले. त्यामुळे त्याचे कारस्थान फसले. म्हणूनच त्याने युगचा शर्ट रस्त्यातच फेकून दिला. या प्रकरणातील आरोपी अरविंद सिंग हा राजेशने पैशाचे आमिष दाखविल्यामुळे गुन्ह्यात सहभागी झाल्याचे सांगतो. तर, राजेश पोलिसांना प्रत्येक प्रश्नाचे वेगवेगळे उत्तर देऊन पोलिसांची दिशाभूल करतो. अनेकदा प्रकृती बिघडल्याचेही नाटक करतो, नंतर स्वत:च चुकीची माहिती देतो. त्याच्या या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग असून, त्यांनाही अटक केली जाण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविली जात आहे.(प्रतिनिधी)