शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! मंत्रालयालाच होतोय दूषित पाण्याचा पुरवठा; 100 हून अधिक अधिकाऱ्यांना उलट्या, जुलाब

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2019 19:48 IST

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सभागृहात हा मुद्दा उपस्थित केला.

मुंबई : राज्याचा कारभार ज्या मंत्रालयातून हाकला जातो तिथेच पिण्याच्या दूषित पाण्यामुळे अधिकारी आणि कर्मचारी रूग्णालयात दाखल झाल्याची घटना समोर आली आहे. मंत्रालयातील दूषित पाण्यामुळे जुलाब आणि वांतिचा त्रास झाल्याने अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. शुक्रवारी सकाळपासून दुपारी २ वाजेपर्यंत १०० हून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांवर मंत्रालयातील शासकीय दवाखान्यात उपचार करण्यात आले. तर, त्रास होत असल्यामुळे अनेकजण रजा घेऊन घरी गेले.

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सभागृहात हा मुद्दा उपस्थित केला. यावर मंत्रालयातील दूषित पाण्यामुळे कर्मचाऱ्यांना झालेल्या त्रासाची बाब खरी असल्याची कबुली सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी दिली.

मंत्रालयात महापालिकेचा पाणी पुरवठा होतो. मंत्रलयातील पाण्याच्या टाक्या क्लोरीन टाकून नुकत्याच स्वच्छ केल्या आहेत. पाणी शुद्ध करण्यासाठीच्या प्युरिफायरचीही तपासणी आणि आवश्यक दुरूस्ती करण्यात आली होती. दूषित पाण्याच्या त्रास एकाच ठिकाणाहून होत असावा, अशी शक्यता आहे. याबाबत दोन दिवसात चौकशी करण्याचे आश्वासन चंद्रकांत पाटील यांनी दिले.

मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याला दुर्गंधी येत होती. त्याबाबतच्या तक्रारी होऊनही पाण्याच्या दर्जामध्ये फरक पडला नाही. मंत्रालयात हजारोंच्या संख्येने अधिकारी व कर्मचारी काम करतात. तसेच महाराष्ट्राच्या विविध भागातून वैयक्तिक व सार्वजनिक कामासाठी सर्वसामान्य जनता येत असते. तरीही पिण्याच्या पाण्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला.

टॅग्स :water pollutionजल प्रदूषणVidhan Bhavanविधान भवनVidhan Parishadविधान परिषद