शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
2
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
4
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
5
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
6
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
7
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
8
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
9
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
10
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
11
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
12
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
13
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
14
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
15
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
16
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
17
‘निवडणूकपूर्व’साठी राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार) अनुत्सुक; निवडणुकीनंतर युती करण्याला मात्र पसंती
18
४८ हजार जणांनी म्हटले, दुबार मतदान करणार नाही
19
‘अमेरिकन ड्रीम’ला H-1B व्हिसाचे नख लागते, तेव्हा...
Daily Top 2Weekly Top 5

पंकजा मुंडे यांच्यावरील आरोपांवरून गदारोळ

By admin | Updated: August 5, 2016 05:14 IST

एका कंत्राटदाराशी भागिदारी असल्याचा आरोप ग्रामविकास तसेच महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांच्यावर झाल्यानंतर गुरुवारी विधानसभेत प्रचंड गदारोळ झाला

मुंबई : मुंबईतील रस्ते घोटाळ्यात नाव असलेल्या एका कंत्राटदाराशी भागिदारी असल्याचा आरोप ग्रामविकास तसेच महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांच्यावर झाल्यानंतर गुरुवारी विधानसभेत प्रचंड गदारोळ झाला. या गदारोळात कामकाज चारवेळा स्थगित करण्यात आले.या घोटाळ्याशी आपला वा आपले पती चारुदत्त यांचा कुठलाही संबंध नाही. आपल्यावर याबाबत आरोप करणाऱ्यांवर आपण सभागृहात हक्कभंगाचा प्रस्ताव आणू, असा इशारा पंकजा मुंडे यांनी दिला. काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी हा आरोप केला होता. सुप्रा मीडिया कंपनी ही आपले पती चारूदत्त पालवे यांची कंपनी आहे. सुप्रा कंपनीने आरपीएस कंपनीसोबत २०१२मध्ये जाहिरातविषयक करार केला. केवळ कंपनीच्या जाहीरातीपुरताच हा करार होता. २०१३ ते २०१६ या काळात आमची या कंपनीशी एका पैशाचीही देवाण-घेवाण झालेली नाही. माझे पती कोणत्याही रस्ते कंत्राटात सहभागी नाहीत. आरएसपी कंपनी जर कोणती कामे करत असेल तर त्यांच्याशी आमचा काहीही संबंध नाही. माझे पती १० ते १२ वर्षांपासून व्यवसाय करतात. मी मंत्री झाले म्हणून माझ्या पतीने व्यवसाय बंद करायचा का, असा सवालही पंकजा यांनी केला.आपण आपल्या पदाचा कोणताही गैरवापर केलेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. माझ्यावर गेल्या दीड वर्षांत अनेक आरोप झाले पण आता माझ्या कुटुंबावरही आरोप केले जात आहेत. माझ्या खात्यावर, आमच्या निर्णयांवर टीका करा पण टीकेसाठी टीका म्हणून माझ्या कुटुंबीयांना उगाच गोवू नका. आमच्यासारख्या तरुण-तरुणींची राजकारणातील उमेद संपविली तर राजकारणात येण्यास कोणी धजावणार नाही, असे त्या म्हणाल्या.वृत्तपत्रांमध्ये आलेल्या आरोपांचा आधार घेऊन टीका करणे योग्य नाही. कोणी पुरावे देत असेल, तर चौकशी जरूर व्हावी; पण उगाच मीडिया-ट्रायल कशाला, असा सवाल ज्येष्ठ सदस्य एकनाथ खडसे यांनी केला आणि मुंडे यांची बाजू उचलून धरली. (विशेष प्रतिनिधी)>मुख्यमंत्र्यांनी सुनावलेपंकजा मुंडे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहत स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रौद्र रूप धारण केले. ते म्हणाले की, कोणताही पुरावा नसताना अशी बदनामी सुरू ठेवणे योग्य नाही. वृत्तपत्रात आलेल्या बातम्यांच्या आधारे आरोप होत असतील तर मी स्वत:च या बाबत हक्कभंग आणेन, असा इशारा त्यांनी दिला. यावेळी विरोधकांच्या घोषणांना प्रत्युत्तर देत भाजपाच्या सदस्यांनीनी जोरदार घोषणाबाजी केली. मुख्यमंत्र्यांकडून धमकीमंत्र्यांवरील आरोप मान्य करायचे नाहीत आणि त्यांचा बचाव करीत क्लीनचिट देण्याचा अजब प्रकार मुख्यमंत्र्यांनी चालविला आहे. विरोधकांनी एखादा आरोप केल्यानंतर त्यावर हक्कभंग आणण्याची धमकी देणारे, हे पहिलेच मुख्यमंत्री असल्याची टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी नंतर पत्रपरिषदेत केली.