शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
2
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
3
बिहारमध्ये हाय अलर्ट, जैश-ए-मोहम्मदचे तीन पाकिस्तानी दहशतवादी नेपाळमधून घुसले
4
सोनं झळाळलं, चांदी कडाडली... दोघांचीही किंमत चांगलीच वधारली! कॅरेटप्रमाणे पटापट चेक करा सोन्याचे लेटेस्ट रेट
5
इंजेक्शन घेऊन वर्ल्ड कप खेळला; आता त्याच्या फिटनेसवर नाही भरवसा! मोहम्मद शमी म्हणाला...
6
Video: महादेव बनलेल्या तरुणाचा सगळ्यांसमोरच गेला जीव; शोभायात्रेतील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Open AI: एआयचा वापर धोकादायक? चॅटजीपीटीमुळे १६ वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप
8
८ कोटींच्या पॅकेजची नोकरी अवघ्या ५ महिन्यात सोडली; IIT मुंबईतील पदवीधर युवकानं का घेतला निर्णय?
9
Koyel Bar : अभिमानास्पद! लेकीने वेटलिफ्टर बनून पूर्ण केलं वडिलांचं मोठं स्वप्न; जिंकले २ गोल्ड मेडल
10
घटस्फोटाच्या चर्चा, चतुर्थीला नववधूसारखी नटली ही अभिनेत्री, एकटीनेच केली बाप्पाची पूजा
11
Video: धक्कादायक! काँग्रेसच्या कार्यक्रमातून PM नरेंद्र मोदींना आईच्या नावाने शिवीगाळ
12
विमाधारकांनो सावधान! पॉलिसी घेताना 'ही' चूक पडेल महागात! क्लेमचा एक पैसाही मिळणार नाही!
13
प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; रुखसाना-रूबी, जास्मिन झाली चांदणी, लग्नाची तुफान चर्चा
14
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमय; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
15
"फॅक्ट्री, घर, दागिने गहाण... लाखोंचं कर्ज पण कुटुंबाने केला नाही सपोर्ट"; सचिनने मांडली व्यथा
16
"मी तुझ्या पतीची दुसरी बायको..."; फोनवरून इतकंच ऐकताच महिलेने आईच्या मांडीवर सोडला जीव
17
श्री गणेशा! नव्या इनिंगची नवी सुरुवात अन् पृथ्वी-आकृती यांच्यातील नात्यातील नवा बंध
18
डोक्यावर पदर घेत पार्थ पवारांसोबत लालबागच्या राजाचं दर्शन घेणारी 'ही' बॉलिवूड अभिनेत्री कोण?
19
Bal Karve: 'गुंड्याभाऊ' काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं ९५ व्या वर्षी निधन
20
 "…तर तुमचं राजकीय करिअर बरबाद होईल", मनोज जरांगे पाटलांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

शरद पवारांना धक्का; NCP च्या १० तालुकाध्यक्षांसह २ माजी नगरसेवक एकनाथ शिंदे गटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2022 11:34 IST

अलीकडेच अशोक गावडे यांनी राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.

मुंबई - राज्यात सत्तांतर झाल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सहभागी होणाऱ्यांची संख्या वाढतच चालली आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठ्या प्रमाणात गळती झालेली असताना आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धक्का दिला आहे. नवी मुंबईतील २ माजी नगरसेवकांसह १० तालुकाध्यक्षांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे नवी मुंबईत शिंदे गटाची ताकद वाढणार आहे. 

नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अशोक गावडे आणि माजी नगरसेविका स्वप्ना गावडेंसह तालुकाध्यक्षांनी राष्ट्रवादीला रामराम करून शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. अलीकडेच अशोक गावडे यांनी राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. भाजपाचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकल्यापासून पक्षाची नवी मुंबईतील ताकद अगदीच तोळामासा झाली आहे. एकेकाळी पक्षाचे महापालिकेवर एकहाती वर्चस्व होते. मात्र, त्यात गणेश नाईक यांच्या ताकदीचा प्रभाव होता. दरम्यान, अशातच अशोक गावडेंनी पक्ष सोडल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसला आता आणखी एक फटका बसला आहे. 

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले होते?नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांच्याशी संपर्क साधला. तुम्ही पक्ष सोडणार अशा बातम्या समोर येत आहेत. तुमची भूमिका काय ती स्पष्ट करा. यावर त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांशी बोलून सांगतो असं म्हटलं. पक्ष कार्यकर्त्यांशी बोलणार म्हणजे तुमच्या मनात काहीतरी ठरलं आहे. त्यांनी मला यानंतर होय मी पक्ष सोडणार आहे असं म्हटल्याचं आव्हाड यांनी सांगितलं. “ते जर पक्ष सोडणार असतील तर त्या ठिकाणी दुसरा अध्यक्ष असल्याशिवाय पर्याय नाही. मी अजित पवार, जयंत पाटील, शरद पवार यांच्याशी चर्चा केली. आता ते पक्ष सोडणार, अध्यक्ष हा द्यावाच लागतो त्यामुळे नामदेव भगत यांची नियुक्ती केल्याची घोषणा करतो असं आव्हाडांनी म्हटलं होतं. 

नवी मुंबईत राष्ट्रवादीला आव्हानआगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाने तयारी सुरू केली आहे. त्यात ठाणे, मुंबई, नवी मुंबईत विशेष लक्ष देण्यात आले आहे. मुंबईतही शिवसेनेचे अनेक नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात आहेत. तर नवी मुंबईत अशोक गावडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे नवी मुंबईत पक्ष संघटना वाढवणं राष्ट्रवादीसमोर आव्हान बनलं आहे. पुढील काही महिन्यात मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह अनेक महापालिका, जिल्हा परिषदा निवडणुका लागतील. त्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाने हालचाली सुरू केल्या आहेत. मुंबईत याआधीच शिवसेनेच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर प्रवक्तेपदाची माळ शीतल म्हात्रेंच्या गळ्यात पडली. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना