सोलापूर : बंदुकीचा धाक दाखवून मिनरल वॉटरचे उत्पादकाकडून ५० हजार रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी नगरसेवक लक्ष्मण जाधव यांचा मुलगा विकी याच्यासह ९ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.तिलक बनवारीलाल उपाध्ये यांच्याकडून यांचा सलगरवस्ती परिसरात मिनरल वॉटरचा प्लॅन्ट आहे. उपाध्ये हे ९ नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच वाजता मोटरसायकलवरून प्लॅन्टकडे निघाले होते. याप्रसंगी अकस्मितपणे विकी जाधव याने त्यांची गाडी अडवून घराच्या तीन कोटी रुपयांच्या बांधकामासाठी त्यांच्याकडे ५० हजार रुपयांची मागणी करीत ती आताच्या आता देण्याचे फर्मान सोडले. तेव्हा भीतीपोटी उपाध्ये यांनी ५ हजार रुपये देऊन टाकले.१६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता विकी जाधवसह ९ जण उपाध्ये यांच्या प्लॅन्टमध्ये जबरदस्तीने घुसले आणि तेथील कामगारांना मारहाण करून हुसकावून लावले. त्यानंतर विकी याने उपाध्ये यांना आठ दिवसांमध्ये ५० हजार रुपये आणले नाहीतर स्वत:जवळील बंदूक दाखवून गोळी घालण्याची धमकी देत त्यांना मारहाण केली. (प्रतिनिधी)
बंदुकीचा धाक दाखवून खंडणी मागितली
By admin | Updated: November 19, 2014 04:47 IST