शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

सायरस मिस्त्री यांचा अपघात झालेल्या ठिकाणी धक्काशोषक यंत्रणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2022 07:43 IST

पुलाच्या कठड्याजवळ क्रॅश अटेन्युएटर

कासा : प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या अपघाती मृत्यूला कारण ठरलेल्या सूर्य नदीवरील पुलाच्या कठड्याजवळ राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने धक्का शोषक यंत्रणा (क्रॅश अटेन्युएटर) कार्यान्वित केली आहे. 

टाटा समूहाचे माजी अध्यक्ष तथा प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांची कार ४ सप्टेंबर २०२२ रोजी मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर  डहाणू तालुक्यातील चारोटीजवळील सूर्या नदीच्या पुलाच्या कठड्याला आदळली होती.  या अपघातात मिस्त्री आणि  जहागीर पंडोल यांचा मृत्यू झाला होता. 

वाहनाचा वेग मर्यादेपेक्षा अधिक असल्याने अपघात झाल्याचा दोषारोप ठेवून वाहन चालवणाऱ्या  महिला डॉ. अनाहिता पंडोल यांच्याविरुद्ध ५ नोव्हेंबरला कासा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. अपघातास कारणीभूत ठरलेल्या सूर्या नदी पुलाच्या कठड्याआधी धक्का शोषून घेणारी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. 

असे आहे उपकरणअपघात झाला त्या ठिकाणापासून ५० मीटर पुढे हे उपकरण लावले आहे. सायरस मिस्त्री यांच्या गाडीचा अपघात  सूर्या नदीच्या ज्या पुलाच्या कठड्यावर कार आदळून झाला, तेथे न लावता पुढे हे उपकरण लावले आहे. ज्या ठिकाणी उपकरण लावले आहे, त्या ठिकाणी वाहतूक विभागली जात असल्याचे महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. या उपकरणावर गाडी आढळल्यास गाडीचा वेग कमी होतो आणि अपघाताची तीव्रता कमी होते, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.