शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
जंगल सफारीला निघाला क्रिकेटचा देव! Sachin Tendulkar ने शेअर केले जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधील निसर्गरम्य Photos
8
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
9
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
10
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
11
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

शिवस्मारकाचा खर्च ३६०० कोटींवर

By admin | Published: October 27, 2016 4:58 AM

अरबी समुद्रात उभारण्यात यावयाच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचा खर्च आता ३६०० कोटी रुपयांवर गेला आहे. या स्मारकाच्या पहिल्या टप्प्याच्या कामापोटी राज्य

मुंबई : अरबी समुद्रात उभारण्यात यावयाच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचा खर्च आता ३६०० कोटी रुपयांवर गेला आहे. या स्मारकाच्या पहिल्या टप्प्याच्या कामापोटी राज्य सरकारने निविदा काढल्या आहेत. नगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी बोटावर मोजण्याइतक्या वृत्तपत्रांत ती छापूनही आली. आता ती अन्यत्र देण्यासंदर्भात राज्य शासनाने राज्य निवडणूक आयोगाची परवानगी मागितली आहे. २००९ मध्ये या स्मारकाचा खर्च ७०० कोटी रुपये इतका होता. २०१२ मध्ये या स्मारकासाठी निविदा काढण्यात आली होती, पण प्रत्यक्षात काम सुरू झालेच नाही. हे काम २०१९ पर्यंत पूर्ण करण्याचा राज्य शासनाचा मानस आहे. त्यासाठी सुमारे २ हजार ५०० कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. एकूण १५.९६ हेक्टर जागेवर भराव घालून हे स्मारक उभारण्यात येणार आहे. स्मारकाचे भूमिपूजन येत्या डिसेंबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.स्मारकासाठी ३६०० कोटी रुपयांची तरतूद राज्य शासनाने केलेली नाही, पण शिवरायांच्या स्मारकासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. (प्रतिनिधी) १५.९६ हेक्टर जागेवर भराव घालून हे स्मारक उभारण्यात येणार आहे. स्मारकाचे भूमिपूजन डिसेंबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे.