शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाची ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
2
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
3
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
4
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
5
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
6
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
7
बापरे बाप! बंजी जंपिंग करताना आला हार्ट अटॅक, हवेतच मुलीचा मृत्यू? Video पाहून भरेल धडकी
8
WTC Final Scenario : टीम इंडियाचं गणित पुन्हा बिघडणार? फायनल खेळण्यासाठी जिंकावे लागतील एवढे सामने
9
नवऱ्यासोबत घटस्फोटाच्या चर्चा, सततच्या ट्रोलिंगवर भडकली ऐश्वर्या; म्हणाली, "साखरपुड्यापासूनच..."
10
Hyundai Creta चं टेन्शन वाढणार, येतायेत दोन 'धाकड' SUV; जाणून घ्या फीचर्स, काय असेल खास?
11
शेख हसीना यांना शिक्षा सुनावल्यानंतर ढाक्यामध्ये हिंसाचार उसळला, युनूस सरकार 'अ‍ॅक्शन'मोडवर; परिस्थिती बिघडली
12
आता तरी घ्या रे! ऋतुराज गायकवाडचा मोठा पराक्रम; पुजाराला मागे टाकत ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
13
गौतम गंभीरने पिचशी छेडछाड थांबवावी अन् मी सांगतोय ते ऐकावं...; सौरव गांगुलीचा थेट सल्ला
14
त्याने आरडाओरड केली, पण तिला जराही दया आली नाही! नवऱ्याला घरात कोंडून बायकोने लावली आग
15
धनंजय मुंडेंच्या पापांमध्ये फडणवीस का सहभागी होताहेत? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
16
आबा-काका गटामधील उमेदवारीचा सस्पेन्स आज अखेरच्या दिवशी संपणार;'बी' फॉर्म ठरवणार नगराध्यक्ष पदाचा उमेदवार, काका गट रिंगणात
17
अपघात, रोग आणि चिंता होईल दूर! फक्त करा प्रेमानंद महाराजांनी सांगितलेले ५ 'रामबाण' उपाय
18
ओला ईलेक्ट्रीक गटांगळ्या खाऊ लागली? पुण्यातील सर्व्हिस सेंटर तोडले, अख्ख्या मुंबईत तेही ठाण्यात एकच सर्व्हिस सेंटर...
19
Sheikh Hasina Net Worth: शेख हसीना यांच्या नोकराकडेच होते २८४ कोटी; 'मॅडम'कडील प्रॉपर्टीचा आकडा वाचून तर बघा...
20
'या' एका चुकीमुळे लीक होऊ शकते तुमचे व्हॉट्सअ‍ॅपचे प्रायव्हेट चॅट; तुम्हाला माहीत आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेची भूमिका ‘लांडगा आला रे’ सारखी, जयंत पाटलांनी केली बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2017 15:25 IST

राज्यातील भाजपा सरकारमधून शिवसेना बाहेर पडेल, असे वाटत नाही. शिवसेनेने अनेकदा सरकारमधून बाहेर पडण्याची वक्तव्ये केली आहेत. जेव्हा ते प्रत्यक्षात कृती करतील, तेव्हाच लोक त्यांच्यावर लोक विश्वास ठेवतील.

सांगली - राज्यातील भाजपा सरकारमधून शिवसेना बाहेर पडेल, असे वाटत नाही. शिवसेनेने अनेकदा सरकारमधून बाहेर पडण्याची वक्तव्ये केली आहेत. जेव्हा ते प्रत्यक्षात कृती करतील, तेव्हाच लोक त्यांच्यावर लोक विश्वास ठेवतील. त्यांची अवस्था ‘लांडगा आला रे आला’ मधील गोष्टीसारखी झाली आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे विधानसभेतील गटनेते आमदार जयंत पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार बैठकीत केली. सांगलीत एका कार्यक्रमाच्या निमित्ताने जयंत पाटील आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शिवसेनेच्या भूमिकेबाबत पाटील म्हणाले की, भाजपविरोधाची शिवसेनेची भूमिका आतबाहेरची आहे. त्यांचा निर्णय पक्का झाला तरच लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतील. राज्यात जशा घटना घडतील तशा शिवसेनेकडून प्रतिक्रिया येतात. पण सरकारमधून बाहेर पडण्याची भूमिका शिवसेना घेणार नाही. ते सत्तेत आहेत. शिवसेनेला विरोधही करावयाचा आहे, पण सरकारला पाठिंबा देताना लाजही वाटत आहे. त्यामुळेच अधूनमधून शिवसेनेच्या नेत्यांच्या भावना व्यक्त होत असतात. प्रत्यक्षात कृती घडेल, तेव्हाच आता लोक शिवसेनेवर विश्वास ठेवतील. त्यांची अवस्था लांडगा आला रे आला या गोष्टीसारखी झाली आहे. त्यामुळे शिवसेना सरकारमधून बाहेर पडेल, अशी अपेक्षा करून स्वप्न पाहण्यात काहीच अर्थ नाही. ग्रामपंचायत व थेट सरपंच निवडणुकीबाबत पाटील म्हणाले की, गतवेळी जिल्ह्यातील सर्वाधिक ग्रामपंचायती राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या ताब्यात होत्या. यंदाही तीच परिस्थिती कायम राहिल. गेल्या तीन ते चार निवडणुकांत भाजपला लाटेमुळे यश मिळाले असले तरी ग्रामपंचायती निवडणुकीत चित्र बदललेले असेल. आम्ही राष्ट्रवादी पक्ष म्हणून ग्रामपंचायती निवडणुकीत भाग घेत नाही. गावात अनेक गट असतात. त्यात वार्डावार्डात भावकीचे राजकारण होत असते. थेट सरपंच निवडीमुळे गावाच्या विकासात अडसर निर्माण होण्याची भीती आहे. सरपंच एका पक्षाचा आणि सदस्य दुसºया पक्षाचे निवडून आले तर अडचण येऊ शकते. त्यासाठी सरपंचाना जादा अधिकार देण्याची गरज आहे. भविष्यात भाजपचे सर्वाधिक सरपंच निवडून आले तर त्यांना जादा अधिकार मिळतील. नाही आले तर सरपंचाचे अधिकार कमी होती. हे सरकार वातावरण बघून निर्णय घेत असते. त्यांना जनतेशी काहीही देणेघेणे नाही, असा टोलाही त्यांनी लगाविला. थेट महापौर निवडीबाबतही असाच प्रकार होणार आहे. सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेचेच उदाहरण घेतल्यास तीनही शहरात चालणारा एकही व्यक्ती नाही. त्यात दोन आमदारांची लोकसंख्येची मान्यता घेऊन महापौर होईल. पण त्याला अधिकारच नसतील, तर तो निवडून येऊन तरी काय करणार? असा सवाल करीत भाजप सरकारकडे निर्णय घेण्याची दूरदृष्टी नाही. सोशल मिडीया, दूरचित्रवाणीवर प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी निर्णय घेतले जात आहेत,असा टोलाही त्यांनी लगाविला. राणेंशी चांगले संबंध-माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काँग्रेस सोडल्याबद्दल विचारता पाटील म्हणाले की, राणे यांनी काँग्रेस, शिवसेनेसह राष्ट्रवादीवर टीका करणार असल्याचे म्हटले आहे. ते जेव्हा राष्ट्रवादीवर बोलतील, तेव्हा बघू. अजून ते कुठल्याही पक्षात गेलेले नाहीत. राणे हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत. त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला असला तरी एक आमदार मात्र घरात ठेवला आहे. त्यामुळे ते काँग्रेस व भाजपापैकी कुणाला मदत करीत आहेत, हे स्पष्ट होते. विरोधी पक्षनेतेपद मला मिळू शकते. त्यामुळेच त्यांना एका आमदारकीचा राजीनामा देऊ नका, असे उच्चस्तरावरून सांगण्यात आल्याचे समजते, अशी मिश्किल टीप्पणीही त्यांनी केली. 

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलShiv Senaशिवसेना