शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

सत्तेशिवाय मातोश्रीची चुल पेटणार नाही: नारायण राणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2018 22:39 IST

वैभववाडीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची जाहीर सभा झाली. नारायण राणे यांनी शिवसेनेवर जहरी टीका केली.

वैभववाडी : सत्तेशिवाय मातोश्रीची चुल पेटणार नाही. त्यामुळे सत्तेला लाथ मारण्याची भाषा करीत असले तरी ते कधीही सत्ता सोडणार नाहीत. कारण सत्ता हाच शिवसेनेचा प्राणवायू असल्याची टीका करीत स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, खासदार नारायण राणे यांनी सिंधुदुर्गचे पालकमंत्री व खासदार यांना लक्ष्य केले.

     वैभववाडीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची जाहीर सभा झाली. नारायण राणे यांनी शिवसेनेवर जहरी टीका केली. ते म्हणाले, '३९ वर्षे जीवाची पर्वा न करता बाळासाहेबांवरील निष्ठेपायी शिवसेनेत झगडत राहीलो. मराठी माणसांसाठी शिवसेना होती असे भासविण्यात आले. मग महाराष्ट्रातील मराठी युवक युवतींसाठी त्यांनी काय केले? असा प्रश्‍न उपस्थित केला. सध्याच्या शिवसेनेने धंदेवाईक राजकारण सुरु केले असून जिल्हाचा पालकमंत्री आणि खासदार कुचकामी ठरल्याची टीका करीत साडेचार वर्षांत जिल्हयासाठी पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत व राज्य सरकारने काय केले? याचे उत्तर त्यांनी जनतेला द्यावे. मी आणलेल्या प्रकल्पांचीच भूमीपूजन आणि वारेमाप घोषणा करण्यापलीकडे रोजगार आणि विकासाचा कोणताही प्रकल्प पालकमंत्री, खासदार आणि कुडाळच्या आमदाराने आणलेला नाही.

      राणे पुढे म्हणाले की, चाळीस वर्षे राज्याच्या राजकारणात आहे. सर्व पक्षांचे राजकारण जवळून पाहीले. परंतु कोणताही पक्ष दीन-दुबळ्यां, जनसामान्यांच्या हिताचे, राजकारण करीत नाही. यावर आपले मत ठाम झाले. त्यामुळेच जनतेच्या हिताचा विचार करुन स्वाभिमान पक्ष काढण्याचा निर्णय आपण घेतला. त्यामुळे जात-धर्म विसरुन 'कोकणी माणूस' म्हणून स्वाभिमान पक्षाच्या पाठीशी राहा, असे आवाहन त्यांनी केले.

विकासाच्या आड येणाऱ्या पक्षांना उध्वस्त करणारविकासात भरारी मारणारा जिल्हा राज्यात सहाव्या क्रमांकावर होता. परंतु गेल्या साडेचार वर्षांत हा जिल्हा पिछाडीवर गेला आहे. त्याला शिवसेना, भाजपा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष जबाबदार आहेत. त्यामुळे राज्य आणि जिल्हा विकासाच्या आड येणाऱ्या या सर्वच राजकीय पक्षांना जनमाणसांच्या मनातून उध्वस्त करुन २०१९ मध्ये स्वाभिमान पक्षाची ताकद दाखवून देवू, असा विश्‍वास राणे यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Shiv Senaशिवसेनाmaharashtra swabhimaani pakshमहाराष्ट्र स्वाभिमान पक्ष