शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
4
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
5
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
6
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
7
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
8
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
9
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना
10
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
11
"महाराष्ट्रातील मतचोरीचाही राहुल गांधींकडून पर्दाफाश, फडणविसांनी तात्काळ राजानीमा द्यावा’’, काँग्रेसची मागणी   
12
डॉक्टरांनी फ्लू सांगितलं पण आईने गुगलवर शोधलं; लेकाला गंभीर आजार असल्याचं समजलं अन्...
13
प्रिती झिंटाच्या संघाची उडाली दाणादाण; फलंदाजांनी केली हाराकिरी, फायनलचं स्वप्न भंगलं?
14
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
15
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
16
Lahori Zeera Success Story: १० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
17
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
18
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
19
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
20
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य

भरत गोगावले चुकले, दीपक केसरकरांचा खुलासा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली समज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2022 13:45 IST

अनावधानाने गोगावले यांच्याकडून विधान आले. ही पक्षाची भूमिका नाही असं दीपक केसरकर म्हणाले.

मुंबई - शिवसेना कुणाची याबाबत शिंदे आणि ठाकरे गटाचा वाद सध्या सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. अद्याप या प्रकरणाचा निकाल लागला नाही. सुनावणीत तारखांवर तारखा दिल्या जात आहेत. त्यातच शिंदे गटाचे प्रतोद आमदार भरत गोगावले यांच्या विधानाने अनेकांच्या भूवया उंचावल्या. सुप्रीम कोर्टाचा निकाल अजून ५ वर्ष लागणार नाही असं विधान गोगावलेंनी केले. त्यामुळे विरोधकांनी शिंदे गट-भाजपाला कोंडीत पकडलं आहे. या प्रकरणी मंत्री दीपक केसरकरांनी खुलासा केला. 

दीपक केसरकर म्हणाले की, एका जाहीर सभेत बोलताना आमचे प्रतोद भरत गोगावले यांनी बोलण्याच्या ओघात काही चुकीच्या गोष्टी निघाला. सीमाभागाच्या संदर्भात बोलताना त्याचा आधार आमची सध्या कोर्टात केस सुरू आहे त्याला दिला. त्यामुळे चुकीचं चित्र महाराष्ट्रासमोर जाण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्ट किंवा कुठल्याही कोर्टात सुनावणी सुरू असते तेव्हा त्यावर आमदाराने, पदाधिकाऱ्यांनी वक्तव्य करू नये अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. मात्र अनावधानाने गोगावले यांच्याकडून विधान आले. ही पक्षाची भूमिका नाही. प्रकरणाबाबत जो विलंब होतो त्यावरही आमचं म्हणणं नाही. न्यायालयाचं कामकाज त्यांच्यारितीने सुरू असते. हा विषय आमच्यापुरता संपलेला आहे. अशी कुठलीही स्टेटमेंट आमदार, पदाधिकाऱ्यांनी काढायचं नाही असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सगळ्यांना दिलेत असं केसरकरांनी सांगितले. 

काय म्हणाले भरत गोगावले?अनेक लोकांनी देव पाण्यात बुडवले होते. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होईल, शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरतील. त्यानंतर आमचे सरकार कोसळेल, अशी आस अनेकजण लावून बसले आहेत. पण तुम्हाला मी सांगतो की, आपली तक्रार घटनापीठाकडे गेली आहे. हे आता जवळजवळ चार ते पाच वर्षे चालणार आहे. दुसरी निवडणूक जिंकून आपण पुन्हा सत्तेत येऊ, सात तारखेला धनुष्यबाण निशाणीची तारीख आहे ती पण आम्ही घेतो तेही तुम्हाला आज सांगतो" असं विधान आमदार भरत गोगावले यांनी केले होते. काय आहे प्रकरण?शिवसेना कुणाची हा वाद सध्या निवडणूक आयोगाकडे आहे. निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंना २३ ऑगस्टपर्यंत सगळी कागदपत्रं सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र उद्धव ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे ४ आठवड्यांची मुदत मागितली होती. शिवसेना आणि शिंदे गटाच्या (Shivsena vs Eknath Shinde) वादावर  सर्वोच्च न्यायालयामध्ये (Supreme Court) सुनावणी पार पडली. या सत्तासंघर्षाचे प्रकरण आता ५ न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे सोपवण्यात आले आहे. तसेच, जोपर्यंत सुनावणी सुरू आहे, तोपर्यंत कोणताही निर्णय घेऊ नका, असे आदेश न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगालाही (Election Commission) दिले आहेत. सध्या हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आणि निवडणूक आयोगाकडे प्रलंबित आहे. 

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेSupreme Courtसर्वोच्च न्यायालय