शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
4
निवडणुकीत अजितदादांना शह द्यायला पार्थ पवार प्रकरण मुख्यमंत्र्यांनी बाहेर काढले?; चर्चांना उधाण
5
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
6
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
7
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
8
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
9
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
10
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
11
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
12
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 
13
'ती' फाइल आधी ३ वेळा माझ्याकडे आली होती; मी ती नाकारली- माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
14
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
15
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
16
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
17
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
18
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
19
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
20
मल्याळी असूनही स्वामींचा भक्त आहे जयवंत वाडकरांचा होणारा जावई; म्हणाले, "तो दर महिन्याला..."

नाव रामाचे घेतात अन् बिभीषणाप्रमाणे वागतात; शिवसेनेचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2022 07:50 IST

आज मुंबई-विदर्भ महाराष्ट्रापासून तोडण्याची कोणाची औकात नाही ती फक्त ठाकरे व शिवसेनेमुळेच. फडणवीस यांची गाडी उताराला लागली आहे व भांडे घरंगळत आहे. ते वैफल्यग्रस्त असल्याने बेभान झाले आहेत असा घणाघात शिवसेनेने देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे.

मुंबई - उत्तर भारतीय श्रीराम व हनुमानाचे भक्त आहेत. श्रीरामाचे वास्तव्य महाराष्ट्रात होते. नाशिकचे पंचवटी आणि नागपूरजवळील रामटेक हे प्रभू श्रीरामाच्या वास्तव्याने पावन झाले, पण नागपूरच्या फडणवीसांनी श्रीरामाचा सत्यवचनाचा गुण घेतलेला दिसत नाही. ते सध्या फक्त खोटे आणि खोटेच बोलत आहेत. राज्य सोडावे लागले तेव्हा श्रीरामाने तो निर्णय स्वीकारला. त्यांना वैफल्य आले असे रामायणात कोठेच दिसत नाही. सीतामाईनेही तो निर्णय स्वीकारला हे विशेष, पण फडणवीसांची रामभक्ती तकलादू आहे. नाव रामाचे घेतात व वागतात बिभीषणाप्रमाणे. फडणवीस यांना वैफल्याने ग्रासल्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर खाली घसरला आहे असा निशाणा सामना अग्रलेखातून शिवसेनेने देवेंद्र फडणवीसांवर(Devendra Fadnavis) साधला आहे.

तसेच राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या बाबतीत हा स्वप्नदोष शक्य नाही. मुळात अयोध्येत बाबरी पाडली तेव्हा भाजपने बगला वर करून पळ काढला व तो दिवस त्यांच्यासाठी ‘काळा दिवस’ होता. नंतर त्या ‘काळय़ा दिवसा’चा हे लोक विजय दिवस वगैरे साजरा करू लागले. त्या ‘काळय़ा दिवसा’च्या शिवसेनेस मिरच्या झोंबण्याचे कारण नाही. बाबरीचा ढाचा पडला तेव्हा फडणवीस नक्की कोठे होते व त्यांचे वय काय होते हा नव्याने संशोधनाचा विषय ठरला आहे असंही शिवसेनेनं(Shivsena) म्हटलं आहे.

सामना अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे

शिवसेनेने बलिदाने दिली व समस्त ठाकरे कुळाने वाघाच्या छातीने संघर्ष केला म्हणून आज मुंबईसह महाराष्ट्र दिल्लीपुढे न झुकता उभा आहे. फडणवीस व त्यांचे सर्वच बापजादे महाराष्ट्राचा लचका तोडण्याचे स्वप्न पाहत होते, ‘महाराष्ट्र दिनी’ दंडास काळय़ा फिती बांधून 105 हुतात्म्यांचा अपमान करीत होते तेव्हा ‘ठाकरे’ अखंड महाराष्ट्रासाठी वाघाचे पंजे मारीत होते.

आज मुंबई-विदर्भ महाराष्ट्रापासून तोडण्याची कोणाची औकात नाही ती फक्त ठाकरे व शिवसेनेमुळेच. फडणवीस यांची गाडी उताराला लागली आहे व भांडे घरंगळत आहे. ते वैफल्यग्रस्त असल्याने बेभान झाले आहेत. हे असेच राहिले तर महाराष्ट्रातील विरोधी पक्षाचे अस्तित्व संपून जाईल. लोकशाहीसाठी हे चित्र चांगले नाही.

वैफल्यग्रस्त विरोधी पक्षनेता व उताराला लागलेली गाडी यांना ब्रेक लावणे कठीण असते. आपले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे नेमके असेच झाले आहे. त्यांच्या मालकांनी त्यांना वेळीच आवरले नाही तर महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचा अपघात अटळ आहे.

महाराष्ट्रात एकदा अपघात झाला की, दिल्लीच्या तंबूचा पायाही हलू लागेल. शिवसेनेच्या मुंबईतील सभेला फडणवीस व त्यांचे लोक चांगल्या पद्धतीने उत्तर देतील असे वाटले होते, पण फडणवीसांनी शिवसेनेला उत्तर देण्यासाठी निवडली ती उत्तर भारतीय सभा.

उत्तर भारतीय सभेत राज्याच्या विरोधी पक्षनेत्यांनी महाराष्ट्राची व मुख्यमंत्र्यांची यथेच्छ बदनामी केली. त्यांच्या उत्तराचे सूत्र एकच होते ते म्हणजे, ‘‘तुम्हाला सत्तेवरून खाली खेचू!’’ सध्या राममंदिराचा विषय चर्चेत असल्याने त्यांनी वेगळय़ा भाषेत सांगितले, ‘‘तुमच्या सत्तेचा ढाचा आम्ही खाली खेचणार!’’ लोकशाहीत हा अधिकार सगळय़ांना दिला आहे.

ज्याच्यापाशी 145 चे बहुमत आहे तो महाराष्ट्रात सरकार स्थापन करू शकतो. आज 170 चे बहुमत ठाकरे सरकारकडे आहे. त्यामुळे फडणवीस गरजतात तसा ढाचा वगैरे पडणार नाही. त्यांनी बाबरीही स्वप्नात पाडली होती. फडणवीस सांगतात, ते तर ढाच्याजवळ प्रत्यक्ष उपस्थित होते व बाबरी पाडण्यात त्यांचा प्रत्यक्ष हातभार होता, पण आडवाणी वगैरे प्रमुख लोक फडणवीसांचा दावा मान्य करीत नाहीत.

पोलिसांच्या किंवा सीबीआयच्या कोणत्याही आरोपपत्रात त्यांचा उल्लेख नाही. पोलिसांनी फडणवीसांना साधे चौकशीसाठीही बोलावल्याची नोंद नाही. याउलट शिवसेना नेत्यांचे आहे. त्यामुळे फडणवीसांचा बाबरी प्रकरणात सहभाग होता की नाही याबाबत केंद्र सरकारनेच एखादी चौकशी समिती नेमायला हवी.

फडणवीस हे त्या युद्धात होते हे सिद्ध झाले तर त्यांचा नागपुरात सत्कार करता येईल. कारण बाबरी प्रकरण विरोधी पक्षनेत्यांनी मनावर घेतले आहे व याबाबत आपल्यावर अन्याय होत असल्याची त्यांची भावना आहे, हे बरे नाही. फडणवीस हे उत्तर भारतीयांच्या सभेत बरेच बोलून गेले. त्यांनी टोमणे मारण्याचा प्रयत्न केला. तेही जमले नाही.

मराठी लोकांची सभा असली की, ते वेगळे बोलतात व हिंदी भाषिकांच्या सभेत ते दुसरेच बोलतात. कालच्या सभेत त्यांनी ‘हनुमान चालिसा’ वाचली. पायात चपला घालून ‘हनुमान चालिसा’ वाचण्याची आपली परंपरा नाही हे भाजपवाल्यांना कोणीतरी सांगायला हवे.

फडणवीस यांना स्वतःच्या राज्यातले चांगले काहीच दिसत नाही. उत्तर भारतीयांच्या सभेत त्यांनी गंगेत वाहत गेलेल्या हजारो प्रेतांवर भाष्य केले नाही. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातून जे लाखो उत्तर भारतीय कोविड काळात उत्तर प्रदेशात गेले, त्यांना योगींच्या भाजप सरकारने राज्यात प्रवेश करू दिला नाही.

चार दिवस वेशीवरच अन्नपाण्याशिवाय उपाशी ठेवले. या अमानुष वागण्यावर श्रीरामही दुःखी झाले, पण फडणवीस यांच्या मनातला ‘राम’ जागा झाला नाही. हे कसले लक्षण समजायचे? सत्ता गेल्याचा इतका मानसिक परिणाम व्हावा? वाघाचे फोटो काढून वाघ होता येत नाही, निधडय़ा छातीने संकटाचा मुकाबला करावा लागतो असे त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना सुनावले आहे.

शिवसेना म्हणजे वाघावर स्वार झालेल्या मर्दांचा पक्ष आहे व आज उद्धव ठाकरे त्यांचे नेतृत्व करीत आहेत. ठाकरे नसते तर महाराष्ट्रात मराठी स्वाभिमान व अस्मिता खतमच झाली असती. शिवसेनेने बलिदाने दिली व समस्त ठाकरे कुळाने वाघाच्या छातीने संघर्ष केला म्हणून आज मुंबईसह महाराष्ट्र दिल्लीपुढे न झुकता उभा आहे. फडणवीस व त्यांचे सर्वच बापजादे महाराष्ट्राचा लचका तोडण्याचे स्वप्न पाहत होते. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा