ऑनलाइन लोकमतकोल्हापूर, दि. 30 - शिवसेनेनं मुंबईत युती तोडली असली तरी उद्धव ठाकरेंनी उर्वरित महाराष्ट्रात युती कायम ठेवावी, असं आवाहन चंद्रकांतदादा पाटील यांनी केलंय. ते आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते. दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी टीका करताना मर्यादा पाळली पाहिजे. जेणेकरून पुन्हा एकत्र येताना अडचणी येणार नाहीत, असा सल्लाही यावेळी पाटील यांनी दिलाय. तसेच शिवसेनेनं या युतीबाबत पुनर्विचार करावा, असंही ते म्हणाले आहेत. त्याचबरोबर शिवसेना-भाजपाचं सरकार पाच वर्षे राहणार असून, शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नाही आणि राष्ट्रवादीची भाजपाला गरज भासणार नसल्याचंही पाटील म्हणाले आहेत. स्वाभिमानी संघटना भाजपासोबत नसल्याचं आपल्याला दु:ख होतं आहे. अजूनही खासदार राजू शेट्टी यांच्याशी आपली चर्चा सुरू असल्याचं पाटील यांनी सांगितले. मनसे आणि शिवसेना एकत्र आले तरी मुंबईत भाजपा किमान ११५ जागा जिंकेल आणि महापौर भाजपाचाच असेल, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
शिवसेनेनं युतीबाबत पुनर्विचार करावा- चंद्रकांत पाटील
By admin | Updated: January 30, 2017 15:42 IST