शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Sachin Ahir : "शिंदे गटाचं पितळ उघड पडलंय, शिवसेना नेत्यांवर आरोप करुन तुम्ही कुठली निष्ठा दाखवताय?" 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2022 16:21 IST

Shivsena Sachin Ahir Slams Eknath Shinde : सुरक्षेच्या बाबतीत एकनाथ शिंदेंबरोबर पक्ष नेतृत्वाने कधीही दुजाभाव केला नाही असा दावा सचिन अहिर यांनी केला आहे.

मुंबई - शिवसेनेतील बंडखोर आमदार सुहास कांदे यांनी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. एकनाथ शिंदे हे गडचिरोलीचे पालकमंत्री असताना त्यांना नक्षलवाद्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती. मात्र त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना झेड प्लस सुरक्षा देऊ नका, अशी सूचना दिली होती, असा गंभीर आरोप सुहास कांदे (Suhas Kande) यांनी केला आहे. यानंतर आता शिवसेनेचे नेते सचिन अहिर (Shivsena Sachin Ahir) यांनी यावर भाष्य केलं आहे. 

"शिंदे गटाचं पितळ आता उघड पडलंय, शिवसेना नेत्यांवर थेट आरोप करुन तुम्ही कुठली निष्ठा दाखवताय?" असं म्हणत सचिन अहिर यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच सुरक्षेच्या बाबतीत एकनाथ शिंदेंबरोबर पक्ष नेतृत्वाने कधीही दुजाभाव केला नाही असा दावाही केला आहे. "त्यांचं पितळ आता उघड पडलंय, त्यांची निष्ठा सत्तेसाठी आहे. कोणताच मुद्दा त्यांच्याकडे नसल्याने नेतृत्वावर आरोप करत आहेत. कोणीही नेतृत्वावर आरोप करू नका. पक्षप्रमुख उद्धवजी आमचे नेते आहेत, आम्ही शिवसेनेमध्ये आहोत, असं सांगत होते. आता शिवसेना नेत्यांवर थेट आरोप करुन तुम्ही कुठली निष्ठा दाखवताय?" असा सवाल सचिन अहिर यांनी केला आहे. TV9 मराठीशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे. 

शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे (Shivsena Ambadas Danve) यांनी सुहास कांदेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. "सुहास कांदेंच्या पायाखालची वाळू सरकलीय, त्यामुळे ते आरोप करत आहेत. मातोश्रीवरून शंभुराजे देसाईंना फोन केल्याचा आरोप खोटा" असं देखील अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. तसेच "झेड प्लस सुरक्षा हा विषय राज्य सरकारचा नसतो. सुरक्षेचा विषय हा केंद्राचा असतो आणि केंद्राने आता ती या लोकांना दिली आहे. शंभुराजे देसाईंकडे सिक्युरिटीचं कामच नाही. पण शंभुराजे आता त्यांच्या जवळचे आहेत त्यामुळे ते काहीही सांगत आहेत. अशा प्रकारचा आरोप करत आहेत. आदित्य ठाकरे मतदारसंघात जात असल्याने सुहास कांदेंच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे" असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. 

सुहास कांदे म्हणाले होते की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात एकनाथ शिंदे यांच्याकडे गडचिरोलीच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी होती. तेव्हा नक्षलवाद्यांनी मारण्याची धमकी दिली. त्यांना मारण्यासाठी ते ठाण्यात आणि मुंबईत आले होते. नक्षलवाद्यांकडून एकनाथ शिंदे यांच्या जीवितास धोका असल्याचा अहवाल गुप्तचर यंत्रणांनी दिला होता. मात्र त्यावेळी एकनाथ शिंदे यांना झेड प्लस सुरक्षा व्यवस्था नाकारण्यात आली. हिंदुत्वविरोधकांना सुरक्षा दिली. मात्र हिंदुत्ववाद्यांना का सुरक्षा देण्यात आली नाही. एकनाथ शिंदे यांना सुरक्षा देऊ नका, असा फोन वर्षा बंगल्यावरून शंभूराजे देसाई यांना फोन करण्यात आला होता. एकनाथ शिंदेंना सुरक्षा का देण्यात आली नाही, असा प्रश्न मला पडला आहे.

टॅग्स :Sachin Ahirसचिन अहिरShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेPoliticsराजकारण