शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Aditya Thackeray: "आम्हाला हिंदूत्व शिकविण्याची गरज नाही, संपलेल्या पक्षावर…", आदित्य ठाकरेंची मनसेवर बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2022 12:33 IST

Aditya Thackeray: "महाराष्ट्रात आणि देशात अनेक महत्वाचे मुद्दे आहेत. महागाईचा वाढता दर पाहता लोकांची सहनशीलता संपू लागली आहे."

परभणी: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहलं आहे. या पत्रामधून राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना इशारा दिला आहे. "आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. सत्ता येत-जात असते, कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही," असं राज ठाकरे म्हणाले. त्यावर आता राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मनसेला खरमरीत टोला लगावला आहे. ते परभणीत माध्यमांशी बोलत होते.

'संपलेल्या पक्षावर बोलत नाही'आदित्य ठाकरे यांना राज ठाकरेंनी लिहिलेल्या पत्राबद्दल विचारलं असता ते म्हणाले की, "मी संपलेल्या पक्षावर बोलत नाही. महाराष्ट्रात आणि देशात अनेक महत्वाचे मुद्दे आहेत. महागाईचा वाढता दर पाहता लोकांची सहनशीलता संपू लागली आहे. त्याच्यावर कोणीही बोलत नाही. जीएसटीचा परतावा मिळणं बाकी आहे, त्यासाठी पत्र लिहिलं तर बरं होईल. त्यांनी(राज ठाकरे) राजकारण नाही तर विकासाच्या मुद्द्यावर बोलायला हवं," असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला.

'आम्हाला हिंदूत्व शिकविण्याची गरज नाही' दरम्यान, आदित्य ठाकरे काल नांदेड दौऱ्यावर होते. त्यावेळीही त्यांनी राज ठाकरे आणि मनसेवर जोरदार हल्लाबोल केला. "आजकाल आम्हाला धर्म-हिंदूत्व शिकविले जाते. परंतु कुणीही आम्हाला ते शिकविण्याची गरज नाही. आमचा धर्म सेवा हा आहे. तर प्राण जाये पर वचन ना जाये, हे आमचे हिंदूत्व आहे. धर्माचे पालन करुन जी वचने आम्ही जनतेला दिली आहेत. ते पूर्ण करुन दाखविणार आहोत, असे आदित्य ठाकरे म्हणालेह होते.

'महाविकास आघाडीमध्ये बेस्ट ऑफ ऑल'नांदेडमध्ये बोलताना आदित्य ठाकरेंनी सत्ताधारी महाविकास आघाडीचे कौतुक केले. "देशाची क्रिकेटची टीम तयार करताना जसे सर्वात्तम बॅटसमन, बॉलर, फिल्डरची निवड करण्यात येते. तशाच प्रकारे महाविकास आघाडीतील सहभागी सर्व जण हे बेस्ट ऑफ ऑल आहेत. सर्वोत्तम लोकांमुळेच राज्यात आता विकासाचा वेग वाढला आहे. विकास काय असतो हे महाविकास आघाडीने दाखवून दिले आहे. तुम्ही आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा, नवा महाराष्ट्र घडल्या शिवाय राहणार नाही,'' असे ते म्हणाले होते. 

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेRaj Thackerayराज ठाकरेShiv SenaशिवसेनाMNSमनसेNandedनांदेडparabhaniपरभणी