शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

Kishori Pednekar : "पेंग्विन सेना महाराष्ट्राची, मुंबईची भरभराट करणार"; किशोरी पेडणेकरांचं भाजपाला रोखठोक उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2022 16:14 IST

Shivsena Kishori Pednekar Slams BJP Ram Kadam : भाजपाचे नेते राम कदम यांनी शिवसेनेचा पेंग्विन सेना असा उल्लेख करत निशाणा साधला. याला आता शिवसेनेने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 

दसरा मेळाव्यावरून भाजपाने शिवसेनेवर बोचरी टीका केली आहे. "दसरा मेळाव्यासाठी मैदान भरावे म्हणून पेंग्विन सेनेने मागितली काँग्रेस-राष्ट्रवादीची मदत" असं म्हणत हल्लाबोल केला. "दसरा मेळावा, काय सत्य... महाराष्ट्राला सांगतील का पेंग्विन सेनेचे नेते?" असा खोचक सवाल भाजपाने विचारला. भाजपाचे नेते राम कदम (BJP Ram Kadam) यांनी शिवसेनेचा पेंग्विन सेना असा उल्लेख करत निशाणा साधला. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. याला आता शिवसेनेने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 

"पेंग्विन सेना महाराष्ट्राची, मुंबईची भरभराट करणार" असं म्हणत शिवसेनेच्या नेत्या आणि  मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Shivsena Kishori Pednekar) यांनी भाजपाला रोखठोक उत्तर दिलं आहे. "पेंग्विन सेनेची तुम्ही काळजी करू नका, मुंबईत ती उत्तम काम करतेय. आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना लोक धन्यवाद देतात कारण परदेशात जाऊन जे सुख पाहायला मिळतं, ते मुंबईत पेंग्विनमुळे मिळतं" असं म्हणत पेडणेकरांनी भाजपाच्या राम कदमांना जशाच तसं उत्तर दिलं आहे. 

"पेंग्विननेच भरभराट केलीय"

"तुम्ही काहीही म्हणा... पेंग्विननेच भरभराट केलीय, ती पेंग्विन सेना महाराष्ट्राची आणि मुंबईची भरभराट करणार" असं देखील किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे. राम कदम यांनी "महत्वपूर्ण... दसरा मेळाव्यासाठी शिवाजीपार्कचे मैदान  भरावे म्हणून पेंग्विन सेनेने  मागितली राष्ट्रवादी तथा काँग्रेसकडे मदत...  आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भरणार शिवाजीपार्क मैदान... काय सत्य? महाराष्ट्राला सांगतील का पेंग्विन सेनेचे नेते" असं आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठीवेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Kishori Pednekarकिशोरी पेडणेकरShiv SenaशिवसेनाRam Kadamराम कदमBJPभाजपाDasaraदसरा