शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनाप्रमुखांनी 'या' मुस्लीम आमदाराला दिली होती 'शिवभक्त' उपाधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2019 14:10 IST

ज्या प्रमाणे ते रमजान ईद किंवा मोहरम साजरे करत असे, त्याच भक्तीने मारुतीच्या मंदिरात मूर्तीसमोर नतमस्तक होऊन नारळ फोडणारे साबीर भाई महाराष्ट्राने पाहिले आहे.

मुंबई – शिवसेनाप्रमुखबाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन शिवसेनेत आलेला मुस्लीम तरुण पुढे आमदार होते आणि शिवसेनेला ठाणे जिल्ह्याच्या शहरी भागासह खेडोपाडी नेण्यात सिंहाचा वाटा उचलतो. मूळच्या नारायणगावच्या (जि. पुणे) असलेले शिवसेनेचे माजी दिवंगत आमदार साबीर शेख यांना शिवसेनेची तोफ म्हणून ओळखले जात असे. शिवसेनेतील एकमेव मुस्लीम नेता, अशीही साबीर शेख यांची ओळख होती. तर शिवसेनाप्रमुखांनी साबीर शेख यांना 'शिवभक्त' ही उपाधी दिली होती.

शिवसेनेच्या स्थापनेपासून अखेर पर्यंत एकनिष्ठ असलेले आणि बाळासाहेब ठाकरे यांचे निकटवर्तीय तसंच शिवसेनेचा मुस्लीम चेहरा अशी ओळख असलेला नेता म्हणजे साबीर शेख होते. वडील प्रवचनकार असल्याने साबीर शेख यांना सुद्धा संतवाड्मयाची गोडी होती. अंबरनाथ मतदारसंघातून निवडून महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत गेले. तेथे १९९१ ते २००४ असे १५ वर्षे ते आमदार होते. युती सरकारच्या काळात ते महाराष्ट्राचे कामगार मंत्री सुद्धा झाले. बाळासाहेब ठाकरेंचे त्यांच्यावर खूप प्रेम होते. शिवसेनाप्रमुख यांनी साबीर शेख यांना 'शिवभक्त' ही उपाधी दिली होती.

साबीर भाई या नावाने त्यांना संपूर्ण महाराष्ट्र ओळखत असे. ज्या प्रमाणे ते रमजान ईद किंवा मोहरम साजरे करत असे, त्याच भक्तीने मारुतीच्या मंदिरात मूर्तीसमोर नतमस्तक होऊन नारळ फोडणारे साबीर भाई महाराष्ट्राने पाहिले आहे. रोजा आणि चतुर्थीचा उपवास त्यांच्यासाठी एक सारखेच होते. मात्र पंधरा वर्षे आमदार आणि पाच वर्षे मंत्री असलेल्या साबीर शेख यांची मालमत्ताही नव्हती आणि शिल्लकही नव्हती त्यामुळेच त्यांना उत्तरायुष्यात कदाचित वृद्धाश्रमात जाण्याची वेळ आली. सध्याच्या राजकारणात असा खरा लोकसेवक मिळणेही दुर्मीळ झाले आहे हे विशेष.