शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

Deepali Sayed : "राजसाहेब लवकर बरे व्हा नाहीतर विधान परिषद निवडणुकीनंतर फडणवीस साहेब एकटे पडतील" 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 13:28 IST

Shivsena Deepali Sayed : शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनीही राज यांना लवकर बरं व्हा असं म्हटलं आहे.

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या पायावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून राज यांना पायाच्या दुखण्याचा त्रास सुरू आहे. राज ठाकरे यांच्यावर 1 जून रोजी शस्त्रक्रिया होणार होती. मात्र नंतर ती पुढे ढकलण्यात आली. कोरोना डेड सेलमुळे ॲनेस्तेशीया देऊ शकत नसल्याने, लीलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी ही शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. राज ठाकरेंच्या प्रकृतीसाठी आणि आरोग्यासाठी मनसैनिकांकडून प्रार्थना केली जात आहे. याच दरम्यान शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद (Shivsena Deepali Sayed) यांनीही राज यांना लवकर बरं व्हा असं म्हटलं आहे.

दीपाली सय्यद यांनी याचवेळी "राजसाहेब लवकर बरे व्हा नाहीतर विधान परिषद निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस (BJP Devendra Fadnavis) साहेब एकटे पडतील" असं म्हणत टोला लगावला आहे. दीपाली यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "माननीय राजसाहेब आपण लवकरात लवकर बरे व्हा नाहीतर विधान परिषद निवडणुकीनंतर फडणवीस साहेब एकटे पडतील. भोंगा अजून अर्धवट आहे" असं सय्यद यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी मनसे आणि महाराष्ट्र भाजपाला ही टॅग केलं आहे

 काही दिवसांपूर्वी "चंद्रकांतदादा भाषणाच्या यादीतून अजितदादांचे नाव गायब झाले कसे?" असं म्हणत दीपाली सय्यद यांनी भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर (BJP Chandrakant Patil) जोरदार निशाणा साधला होता. तसेच "मोदींच्या बोलण्याने देश चालत नाही आणि फडणवीसांनी मोठेपणाकरून ते मोठे होत नाहीत, माफी मागा" असं म्हणत टीकास्त्र सोडलं होतं. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत ट्विट केलं होतं. 

"मोदींच्या बोलण्याने देश चालत नाही आणि फडणवीसांनी मोठेपणाकरून ते मोठे होत नाहीत, माफी मागा"

"चंद्रकांतदादा भाषणाच्या यादीतून अजितदादांचे नाव गायब झाले कसे? स्थानिक प्रतिनिधींचे पासेस कुठे? तुम्ही स्टेजवर मग स्थानिक प्रतिनिधींना अशी वागणूक का? मोदींच्या बोलण्याने देश चालत नाही आणि फडणवीसांनी मोठेपणाकरून ते मोठे होत नाहीत. PMO ने माफी मागा, ही भाजपाची सभा नव्हे. जनतेला उत्तर द्या!" असं दीपाली सय्यद यांनी म्हटलं होतं.  

टॅग्स :deepali sayedदीपाली सय्यदDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRaj Thackerayराज ठाकरे